तुम्हाला माहीत आहे का? शाहरूख खानची चंद्रावर जमीन आहे जी त्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे..

तुम्हाला माहीत असेल की २०१८ मध्ये शाहरुख खानचा झिरो हा चित्रपट आला होता. ज्यामध्ये शाहरुख खानने जो रोल केला आहे त्यात तो मंगळावर गेलेला दाखवले आहे. ही काल्पनिक कहाणी होती पण शाहरुख खानचे नाव अवकाशात कधीच लिहिले गेले आहे.

जे शाहरुख खानचे खरे फॅन्स आहेत त्यांना माहीत असेल की, शाहरुख खानची चंद्रावर जमीन आहे. विशेष म्हणजे ही जमीन शाहरुख खानने विकत घेतलेली नाही. शाहरुखची एक फॅन आहे जी त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला चंद्रावर त्याच्यासाठी एक तुकडा खरेदी करते.

ही फॅन भारतीय नाही ऑस्ट्रेलियन आहे. स्वतः शाहरुख खानने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ती ऑस्ट्रेलियन महिला शाहरुखच्या दर वाढदिवसाला त्याच्यासाठी एक चंद्राचा तुकडा खरेदी करते.

बरेच वर्ष झाले हे असंच चालू आहे आणि शाहरुखला रूनल रिपब्लिक सोसायटीकडून त्याचे प्रमाणपत्र देखील आले आहे. ऑनलाईन लुनर रिअल इस्टेट एजन्सीनुसार sea of tranquility हा चंद्रावरचा सर्वात लोकप्रिय हिस्सा आहे. एक एकर तुकड्याची किंमत ४० अमेरिकन डॉलर म्हणजे २८०० रुपये आहे. ज्यामध्ये

शाहरुख खानची चंद्रावर कित्येक एकर जमीन आहे. २ नोव्हेंबरला शाहरुखचा ५५ वा वाढदिवस होता. शाहरुख खानची मैत्रीण आणि लोकप्रिय अभिनेत्री जुही चावलाने शाहरूखच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या नावावर ५०० रोपे लावली.

जुहीने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. शाहरुख खानची येणारी फिल्म पठाण यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोनसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.