शाहरुख खानने जेव्हा प्रियांका चोप्राला लग्नासाठी मागणी घातली होती, तेव्हा तिने दिले होते हे उत्तर

बॉलिवूड सोडल्यानंतर आता प्रियंका चोप्रा ग्लोबल आयकॉन बनली आहे. प्रियंकाने आपल्या परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले आहे. प्रियंकाच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून व्यक्त केला जाऊ शकतो की यावेळी तिला आपला पती निक जोनास याच्यासोबत प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रियंकाने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली आणि बॉलिवूडमधील सर्व बड्या कलाकारांसह चित्रपट केले. आता सोशल मीडियावर प्रियंकाचा जुना व्हिडिओ प्रसारित केला जात आहे.

प्रियंकाला या स्पर्ध्येत शाहरुख खान हा प्रश्न विचारीत आहे. हा व्हिडीओ २००० साली झालेल्या मिस इंडिया स्पर्ध्येचा आहे. फिट लूक मासिकाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावेळी प्रियंकाला प्रश्न विचारण्यात आला की तू मोहम्मद अझहर, व्यापारी किंवा शाहरुख खान यांच्यापैकी लग्नासाठी कोणाची निवड करशील? त्यावर प्रियांकाने उत्तर दिले की, यावर प्रियंकाने भारतीय क्रिकेटपट्टूची निवड केली आहे.

प्रियांका यावर म्हणते की, मी भारतीय क्रिकेटपट्टूची निवड करेल. कारण मी जेव्हा घरी येईल तेव्हा मी त्याला पाठींबा देण्यासाठी मैदानावर हजर राहील. ही वेगळी गोष्ट आहे की प्रियंकाने निक जोनसची जोडीदार म्हणून निवड केली.

निक चांगला गायक आहे. प्रियंका यानंतर मिस वर्ल्ड पण झाली. शाहरुख आणि प्रियांका दोघांनी पण एकत्र काम केले आहे. शाहरुख खानसोबत प्रियांका ओम शांती ओम, डॉन आणि डॉन २ च्या भागांमध्ये दिसून आलेली आहे.

ताज्या बातम्या
लसीचे सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करणे पडेल महागात, जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान

बॉलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे अक्षय खन्ना आजही आहे अविवाहित, जाणून घ्या कारण..

आई म्हणायचं की राक्षस! प्रियकरासोबत मिळून पोटच्या पोराचा काढला काटा, प्रेमात ठरत होता अडसर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.