…म्हणून शाहरुख खानच्या मुलीला डेट करण्याचे धाडस कोणी करत नाही; शाहरुख खानने सांगितले डेटचे सात रुल

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान खुप चर्चेत असते. आज सुहानाचा वाढदिसस असून ती २१ वर्षांची झाली आहे. सुहान खान पण आता लाईमलाईटमध्ये आली आहे.

सुहाना कधी तिच्या कधी करिअर वरुन तर कधी तिच्या ग्लामरस अंदाजावरुन सोशल मीडियावर चर्चेत असते. आज आपण तिच्याच बद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

सुहाना बऱ्याचवेळी तिचे वडिल शाहरुखसोबत दिसून आली आहे. तसेच शाहरुख अनेकदा कॅमेरासमोर तिला घेऊन आला आहे. तसेच तिच्या आयुष्याबद्दल आणि तिच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी शाहरुखने मीडियासोबत शेअर केलेल्या आहे.

अशात शाहरुख खान एका मुलाखतीत सुहानाच्या लग्नाबद्दल बोलला होता. जो पण सुहानाला डेट करेल, त्याच्यासाठी मी काही रुल बनवले आहे. ते सात रुल्समध्ये तो फीट बसत असेल, तरच तो सुहानाला डेट करु शकेल.

पहिला रुल- त्याच्याकडे नोकरी हवी, दुसरा- मला तु आवडत नाही, तिसरा रुल- मी प्रत्येक ठिकाणी आहे, चौथा रुल- एक वकिल ठेऊन घे, पाचवा रुल- ती माझी राजकुमारी आहे, पण माझ्या आधीन नाही, सहावा रुल- मला तुरुंगात जाण्याची तयारी ठेवतो आणि सातवा रुल- तो तिच्यसोबत जे काही वाईट करेल मी पण त्याला तशीच शिक्षा देईल, असे शाहरुख खानने म्हटले होते.

तसेच या मुलाखतीत त्याने सुहानाच्या बॉलिवूडच्या डेब्यु विषयी सुद्धा चर्चा केली होती. जर सुहानाला अभिनेत्री बनायचे असेल, तर तिला अजून ३-४ वर्षे ऍक्टिंग शिकावी लागेल. सध्या तरी तीचे शिक्षण पुर्ण करत आहे, असे शाहरुखने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी वाचा या ३ सोप्या गोष्टी, तज्ज्ञांनी दिलाय महत्त्वाचा सल्ला
पहा महिलेने कसा केलाय काचेच्या बाटल्यांवर बॅलन्स; व्हिडिओ पाहून तोंडात बोटं घालाल
ह्या बाळाचा डान्स पाहून भले भले तोंडात बोट घालतील; गाणंही किती गोड गातय..; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.