बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. भारतासह जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. शाहरूखवरील प्रेमामुळे त्याचे चाहते काहीही करायला तयार होतात. त्याची एक झलक मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. असाच एका चाहता शाहरूखच्या घरात घुसला होता. मात्र, तो शाहरूखला भेटण्यासाठी आला नव्हता. तर चाहता घरात घुसण्याचे कारण सांगितल्यावर स्वतः शाहरूख खानही अचंबित झाला होता.
शाहरूखने एका मुलाखतीत बोलताना स्वतः हा किस्सा सांगितला. शाहरूखने म्हटले की, त्याच्या मन्नत घराजवळ मोठी सेक्युरिटी असतानाही एक चाहता सुरक्षारक्षकाची नजर चुकवून घरात घुसला होता. पण तो शाहरूखला भेटायला न जाता स्विमिंग पूलकडे गेला.
तिथे चाहत्याने त्याचे कपडे उतरवायला सुरुवात केला आणि पूलमध्ये गेला. त्यानंतर शाहरूखला ही माहिती मिळताच तो त्याला भेटायला स्विमिंगपूलजवळ पोहोचला. स्विमिंग पूलजवळ गेल्यावर शाहरूख मात्र, चाहत्याच्या उत्तराने थक्क झाला.
शाहरूखला भेटण्यासाठी किंवा त्याच्या ऑटोग्राफसाठी तो चाहता मन्नत घरात आला नव्हता. तर स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यासाठी आला होता. चाहत्याने शाहरूखला म्हटले की, ‘मला काही नको. मला फक्त या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची आहे ज्यामध्ये स्वतः शाहरूख खान आंघोळ करतो’.
दरम्यान, शाहरूख खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तो २०१८ साली आलेल्या ‘झिरो’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मात्र, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही.
लवकरच शाहरूख ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
अबब! करीना कपूरने एकाच चित्रपटात घातले होते तब्बल १३० ड्रेस; जाणून घ्या यामागचं कारण
‘जय भीम’च्या शिरपेचात मानाचा तुरा; ऑस्करच्या युट्यूब चॅनलवर दिसणारा पहिला भारतीय चित्रपट
मिथुन चक्रवर्तीला चार मुलं, पण पापा म्हणून हाक ऐकण्याचा आनंद कधीच नाही मिळाला, जाणून घ्या काय आहे कारण