Share

Shahrukh Khan : मुलासोबत तिरंगा फडकावणे शाहरुखला पडले महागात, नेटकरी म्हणाले, आर्यनला ड्रग्स घेऊन..

shahrukh-khan-flag-hoisting-video

Shahrukh Khan : १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. शाहरुख खानने पत्नी गौरी आणि त्याच्या दोन मुलांसह ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला, मात्र त्याचे कौतुक होण्याऐवजी त्याला टीकेचा सामना करावा लागला आहे.(shahrukh khan, flag hoisting, video, independence day, gauri khan, aryan khan)

कुणी त्याच्या आगामी चित्रपटावर निशाणा साधला, तर कुणी त्याच्या मुलाची खरडपट्टी काढली. शाहरुख खानने अलीकडेच आपल्या घराच्या ‘मन्नत’ च्या टेरेसवर तिरंगा फडकावला आणि स्वातंत्र्याच्या उत्सवात सामील झाला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मुलगा आणि पत्नीही होती. त्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओसोबत शाहरुख खानने लिहिले की, ‘मुलांना आपल्या भारत देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचे महत्त्व शिकवत आहे. थोडा वेळ लागेल, पण झेंडा फडकावतानाचा अभिमान, प्रेम आणि आनंद लगेच जाणवला. काही मिनिटांतच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

यावर लोकांनी टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्याचे कौतुक केले तर काहींनी त्याची खरडपट्टी काढली. किंग खानच्या आगामी चित्रपटापासून ते त्याच्या मुलांपर्यंत त्याची खिल्ली उडवली. एका यूजरने शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ आणि ‘डंकी’ या सिनेमांवर निशाणा साधला. त्याने लिहिले, ‘हे सर्व केल्याने पठाण आणि डंकी हिट होणार नाहीत.’

दुसर्‍याने लिहिले की, ‘आर्यनला बोल ड्रग्स घेऊन ध्वजाला हात लावू नका. दोन्ही फोटो एकत्र करून एक कोलाज शेअर करताना लोक शाहरुख खानला टार्गेट करत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.

शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच त्याच्याकडे राजकुमार हिरानी यांचा डंकी देखील आहे, ज्याचे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे. दुसरीकडे तिसऱ्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो म्हणजे ‘जवान’. या तिन्ही चित्रपटांसाठी किंग खान बिझी आहे.

महत्वाच्या बातम्या
रोहित पवारांची ‘दादा’ स्टाईल प्रतिक्रिया; आतापर्यंतचं सगळंच काढलं, कंबोजांची कुंडली मांडली!
घरात शांतता हवी असेल तर, पत्नी पतीला घराबाहेर काढू शकते; न्यायालयाचा मोठा निर्णय
…तर पत्नी पतीला घराबाहेर हाकलून देऊ शकते; न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

बाॅलीवुड क्राईम ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now