तुम्हाला माहीत नसेल पण शाहरूखने एकदा दोनदा नाही तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे; वाचा पुर्ण किस्सा

अस बोलतात प्रेम हे आंधळे असते म्हणून लोक प्रेमामध्ये काहीही करायला तयार असतात. प्रेमात सगळे काही माफ असते. सामान्य लोकचं नाही. तर बॉलीवूडचे अनेक कलाकारही प्रेमात पागल झाले आहेत. त्या सर्वांनी प्रेमात पागल होऊन अनेक गोष्टी देखील केल्या आहेत.

आज आपण बॉलीवूडच्या पावर कपलची लव्ह स्टोरी पाहणार आहोत. पावर कपल म्हणजे तुम्हाला समजलेच असेल आपण कोणाबद्दल बोलत आहोत.
आपण बोलत आहोत शाहरुख खान आणि गौरीबद्दल.

बॉलीवूडचा किंग शाहरुख खानने देखील पत्नी गौरीसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. या दोघांची लव्ह स्टोरी खुपच हटके आहे. अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर या दोघांचे लग्न झाले आहे.

म्हणून ही स्टोरी खुप हटके आहे. शाहरुख खान गौरीसाठी त्याचे संपूर्ण करिअर देखील सोडायला तयार होता. त्याला त्याच्या आयूष्यात गौरी सर्वात जास्त महत्वाची होती. म्हणून त्याने कोणताही विचार न करता गौरीसोबत लग्न केले.

गौरी आणि शाहरुख खानची पहिली भेट १९८४ मध्ये झाली होती. त्यावेळी शाहरुख खान पाहताच क्षणी गौरीच्या प्रेमात पडला होता. त्याला गौरी त्याची जीवनसाथी म्हणून हवी होती. शाहरुख आणि गौरी लग्नानंतर अगोदर सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

शाहरुख खान आणि गौरी जेव्हा रिलेशनशीपमध्ये होते.तेव्हा शाहरुख गौरीसाठी खुप पझेसिव्ह होता. त्यामूळे त्या दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. या सर्व गोष्टींना कंटाळून गौरी खान शाहरुखला सोडून मुंबईला निघून आली होती. पण तिला शोधण्यासाठी शाहरुख देखील मंबईला आला. तो अनेक दिवस फक्त गौरीला शोधत होता.

शेवटी त्याला गौरी भेटली. तेव्हा त्याने लगेच तिला लग्नासाठी प्रपोज केले. गौरीने लग्नाला होकार दिला. पण तिचे घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. कारण गौरी हिंदू होती आणि शाहरुख मुस्लिम होता.

सुरुवातीला शाहरुख खानने गौरीच्या घरच्यांना तो हिंदू आहे असे सांगितले होते. म्हणून गौरीच्या घरचे आनंदी होते. एक दोन वर्षे नाही तर पाच वर्षे शाहरुख गौरीसाठी हिंदू बनला होता. हे खोट जास्त काळ टिकू शकले नाही.

गौरीच्या घरच्यांना शाहरुखबद्दल सगळं काही खरं खरं समजलं होते. पण या दोघांचे प्रेम बघून ते प्रभावित झाले आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. या दोघांनी तीन वेळेस लग्न केले आहे. पहिले लग्न कोर्टात केले होते. त्यानंतर दुसरे लग्न हिंदू पद्धतीने केले होते आणि तिसरे लग्न मुस्लिम पद्धतीने केले होते.

लग्नानंतर गौरीच्या घरच्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. म्हणून नातेवाईक लग्नानंतर गौरी धर्म बदलणार का? ही बुरखा घालणार का? असे अनेक प्रश्न विचारत होते. या प्रश्नांना कंटाळून शाहरुख खान चिडला होता.

त्यावेळी शाहरुख म्हणाला होता की, गौरी तु उद्यापासून बुरखा घालावा लागेल आणि नमाज पठण करावं लागेल. हे उत्तर ऐकून सर्व नातेवाईक शांत झाले होते. पण ही मस्करी होती असे शाहरुखने सांगितले. ही मस्करी गौरीच्या घरच्यांना आवडली नव्हती. त्यामूळे ही मस्करी शाहरुखला थोडी महागात पडली होती.

लग्नानंतर गौरीने धर्म बदलला नाही. हे दोघेही आपापल्या धर्माचे पालन करतात. ज्या व्यक्तीला जी गोष्ट करायची आहे. ती गोष्ट त्याने करावे असे शाहरुख खानला वाटते. तुमच्या प्रेमात तुमचा धर्म कधीही आडवा येत नाही. म्हणून गौरीने लग्नानंतर धर्म बदलला नाही.

या दोघांच्या लग्नाला २८ वर्षे झाली आहेत. पण तरीही हे दोघे आजही सुखाने संसार करत आहेत. शाहरुखने ज्यावेळी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला त्यावेळी गौरी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी होती. दोघेही एकमेकांच्या कामाचा खुप आदर करतात.

महत्त्वाच्या बातम्या –

..म्हणून आमीर खान बाॅलीवूडपासून दूर राहतो; स्वत: आमीरनेच सांगीतली बाॅलीवूडची काळी बाजू

गर्लफ्रेंडसाठी खूप काही केले, चूक नसताना माफी मागीतली; तरीही अजून एकटाच आहे..

पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयूरी देशमुखने पहिल्यांदाच केला अनेक गोष्टींचा खुलासा

स्विफ्ट, डिझायर, वॅगनआर मिळवा फक्त दोन लाखांत; मारूती सुझुकी कंपनीने दिला स्वस्त पर्याय

मोटारसायकलचे नियम सरकारने बदलले ; डबल सीटच्या नियमासह महत्वाचे ५ बदल जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.