करोडोंच्या संपत्तीचा मालक झाला तरी ‘या’ व्यक्तीला नाही विसरला शाहरूख; आजही ते दिवस आठवल्यावर..

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आज इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याला हे यश मिळाले आहे. आजच्या घडीला त्याच्या स्टारडमला टक्कर देणारा कोणताही कलाकार इंडस्ट्रीमध्ये नाही. भारतातच नाही तर भारता बाहेर देखील त्याचे स्टारडम खुप मोठे आहे.

भारताबाहेर देखील शाहरुख खानचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. म्हणून आज त्याचा करोडोंचा चाहता वर्ग आहे. अभिनयासोबतच शाहरुखला त्याच्या स्टाईलसाठीसुद्धा ओळखले जाते.

शाहरुखसोबतच त्याच्या घराची देखील नेहमी चर्चा होत असते. शाहरुखचा बंगला मन्नत मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बंगल्यांपैकी एक आहे. रोज लाखो लोकं त्याचा बंगला बघण्यासाठी मुंबईला जातात. त्याच्या या बंगल्याची किंमत करोडोंमध्ये आहे.

आज करोडोंच्या घरात राहणारा करोडोंच्या संपत्तीचा मालक असणारा शाहरुख खानचे एकेकाळी राहण्याचे वांदे होते. लग्नानंतर शाहरुख आणि गौरी मुंबईमध्ये राहण्यासाठी घर शोधत होते. पण त्यांना घर मिळाले नाही. शेवटी त्यांना निर्माते अजीज मिर्जाच्या घरात राहावे लागले होते.

अनेक अडचणींनंतर शाहरुख खान आणि गौरीचे लग्न झाले होते. ज्यावेळी त्यांचे लग्न झाले. त्यावेळी शाहरुख ‘दिल आशना है’ चित्रपटाची शुटींग करत होता. त्यामूळे लग्नाच्या दिवशीच त्याला हेमा मालिनीचा फोन आला आणि त्यांनी लगेच शाहरुखला भेटायला बोलावले.

हा चित्रपट त्याच्यासाठी खुप महत्वाचा होता. म्हणून त्याने लगेच गौरीसोबत मुंबईची ट्रेन पकडली आणि मुंबईला आला. त्याला हेमा मालिनी तर भेटल्या नाहीत. पण काम नक्की मिळाले. शाहरुख नऊ ते रात्री दोन पर्यंत चित्रपटाची शुटींग करत होता. तो त्याच्या कामात मग्न झाला होता.

शाहरुख शुटींग करत होता त्यावेळी गौरी मेकअप रुममध्ये त्याची वाट बघत होती. रात्री दोनला शाहरुखचे काम संपले आणि तो मेकअप रुममध्ये आला. त्याने पाहीले की, गौरी एका खुर्चीवर झोपी गेली होती. गौरीला मेकअप रुममध्ये झोपलेल पाहून शाहरुखच्या डोळ्यात पाणी आले. या काळात त्याला अजीज मिर्जाने मदत केली.

शाहरुख खानने स्वत: एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. त्याने सांगितले की, ‘ज्यावेळी माझे लग्न झाले होते. त्यावेळी माझ्याकडे मुंबईत राहण्यासाठी घर नव्हते. त्यावेळी निर्माते अजीज मिर्जा माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी मला आणि गौरीला राहण्यासाठी त्यांचे घर दिले’.

शाहरुखने पुढे सांगितले की, ‘काही दिवसांनी अजीज यांना देखील घराची अडचण निर्माण होऊ लागली. म्हणून ते देखील आमच्यासोबत राहू लागले. मी त्यांचे कौतूक करत नाही. मला फक्त एवढे सांगायचे आहे की, ते फक्त चित्रपट निर्माते नाहीत तर ते माझ्या आयूष्याचे देखील निर्माते आहेत’.

महत्वाच्या बातम्या –

हेमामालिनीसोबत किसिंग सीन करणार होते फिरोज खान; पण ‘या’ व्यक्तीने केला कडाडून विरोध
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; पहा लग्नाचे फोटो
‘लव्ह स्टोरी’ फेम अभिनेत्री विजेता पंडितची झाली आहे खुपच वाईट अवस्था; आर्थिक अडचणींचा करत आहे सामना
…म्हणून अभिनेत्री आयशा झुल्काने कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.