अर्णबचा पाय खोलात! बॉलीवूडमधील बड्या स्टार्सने खेचले कोर्टात; लावले ‘हे’ गंभीर आरोप

मुंबई | बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे आता बॉलीवूड-अर्णब हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आज दिल्लीतील कोर्टात रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे.

ही याचिका दाखल करण्यामध्ये अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे.

वाचा काय आहे याचिकेत..
कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असे या याचिकेत म्हटले आहे. याचबरोबर बॉलिवूडविरूद्ध बेजबाबदार, अपमानास्पद आणि बदनामीकारक टीका प्रसिद्ध करू नये, अशी विनंती या असोसिएशनने कोर्टाला केली आहे.

वाचा कोणत्या-कोणत्या प्रॉडक्शन हाऊसेसनी केली याचिका दाखल…
यामध्ये, द प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया, द सिने ऐंड टीवी आर्टिस्ट एसोसिएशन, द फिल्म ऐंड टीवी प्रोड्यूसर्स काउंसिल, स्क्रीनराइटर्स एसोसिएशन, आमिर खान प्रोडक्शंस, ऐड-लैब फिल्म्स, अजय देवगन फिल्म्स, आंदोलन फिल्म्स, अनिल कपूर फिल्म ऐंड कम्युनिकेशन नेटवर्क, अरबाज खान प्रोडक्शंस, आशुतोष गोवारिकर प्रोडक्शंस, बीएसके नेटवर्क ऐंड एंटरटेनमेंट, केप ऑफ गुड फिल्म्स

क्लीन स्लेट फिल्म्स, धर्मा प्रोडक्शंस, एमे एंटरटेनमेंट ऐंड मोशन पिक्चर्स, एक्सेल एंटरटेनमेंट, फिल्मक्राफ्ट प्रोडक्शंस, होम प्रोडक्शन, कबीर खान फिल्म्स, लव फिल्म्स, मैकगफिन पिक्चर्स, नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट, वन इंडिया स्टोरीज, राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स

रेड चिलीज एंटरटेनमेंट, रिलायंस बिग एंटरटेनमेंट, रील लाइफ प्रोडक्शंस, रोहित शेट्टी पिक्चर्स, रॉय कपूर प्रोडक्शंस, सलमान खान वेंचर्स, सोहेल खान प्रोडक्शंस, सिख्या एंटरटेनमेंट, टाइगर बेबी डिजिटल, विनोद चोपड़ा फिल्म्स, विशाल भारद्वाज फिल्म और यशराज फिल्म्स, यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या
एकेकाळी भीक मागून दिवस काढत होता, आज कमावतोय करोडो; ॲमेझाॅन, वालमार्ट आहेत क्लायंट
दोन वेळेच्या जेवणाची होती पंचाईत; मात्र गडी खचला नाही तर लढला; करतोय करोडोंची उलाढाल
मूतखड्यामुळे त्रस्त आहात? ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा व मिळवा मुतखड्यापासून मुक्ती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.