बिहारमध्ये भाजपला जेडीयूपेक्षा जास्त जागा; आता मुख्यमंत्री पदाबाबत भाजप म्हणतय..

मुंबई |  बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सुरूवातीला तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मुसंडी मारली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये हे चित्र बदलत गेलं. सध्या एनडीएने मुसंडी मारली आहे.

तसेच निकालापूर्वी करण्यात आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत होता. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे.

याबाबत सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी मतमोजणीच्या एक दिवस आधी बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार असा दावा केला आहे. ‘बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, याबाबत त्यांनी एक निवेदन जारी केले की, ‘बिहारमधील तीन टप्प्यांच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनने मोठी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरच्या दोन तासांत हे चित्र संपूर्णपणे पालटले असून आता भाजपप्रणित आघाडीने भक्कम आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला एनडीए जवळपास १२७ तर महागठबंधन १०४ जागांवर आघाडीवर आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
“बिहार निवडणुकीतील विजय देवेंद्र फडणवीसांमुळेच”
तेजस्वी यादवांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगणार? एनडीएने महागठबंधनला टाकले मागे
कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही; तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.