शिवजयंतीदिनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा गायल्याने पुण्यात शाहीराला अटक

मुंबई | शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी झाली. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन करण्यात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे पोवाडेचे कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी, असे पत्र राज्यसरकारला पाठविले होते.

परंतु, मावळे यांच्या पत्राला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याचाच निषेध करत पुण्यातील लाल महाल येथे सविनय कायदेभंग करत पोवाडे सादर करणाऱ्या शाहीर हेमंतराज यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. ट्विट करत फडणवीस म्हणतात, महाविकास आघाडी सरकारच्या मोगलाईचा आणखी एक संतापजनक प्रकार!‬ शिवजयंतीला शिवगौरवाचे पोवाडे नाही गायचे तर काय करायचे? असा सवाल उपस्थित केला आहे.

वाचा शाहीर हेमंतराजे पत्रात काय म्हंटलय…
या पत्रात शाहीर हेमंतराजे म्हणतात,”छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही पोवाड्याची परंपरा चालत आली आहे.आणि आज जर अशा सांस्कृतिक परंपरा सांगणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली तर पोवाडा कायमचा संपून जाईल. याच गोष्टीचा आम्ही निषेध केला.”

शिवजयंतीला पोवाडा नसणं म्हणजे आत्म्याशिवाय शरीर. शिवजयंतीचा आत्माच सरकारने कडून घेतला याचा आम्ही निषेध केला आणि पोवाडे गायले म्हणून आम्हाला अटक करण्यात आली. याबाबत आम्ही निदर्शनेही केली मात्र तरीही सरकारला जाग आली नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या आणि छत्रपतींना आपलं दैवत मानणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. मात्र आता त्यांच्या मुलाकडे सत्ता असताना राज्यात छत्रपतींच्या जयंतीदिनी उत्सवाला मनाई करणं अत्यंत दुर्दैवी आणि कर्मदरिद्रीपणाचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
चित्रपटातील अभिनेत्यानेच केली रोहित शेट्टीच्या चित्रपटातील ‘त्या’ स्टंटची पोलखोल, पहा व्हिडीओ
ऐश्वर्याने कुटूंबाच्या विरोधात जाऊन दिले होते किसींग सीन्स; मिळाली होती नोटीस
बडीशेपची शेती करुन ‘हा’ पठ्ठ्या करतोय लाखोंची कमाई; वाचा कशी करता येईल ही शेती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.