सिक्सर मारल्यामुळे संतापला शाहीन आफ्रिदी, फलंदाजाला बॉल मारुन केली दुखापत; पहा व्हिडिओ

सध्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी २० मालिका सुरु आहे. आज त्यांच्यात एक सामना झाला असून हा सामना पाकिस्तान संघाने ८ गडी राखून जिंकला आहे. पण यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात एक लाजीरवाणी घटना घडली आहे.

शनिवारी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील दुसर्‍या टी २० सामन्यात एक लाजिरवाणी घटना घडताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सामन्यादरम्यान असे काही केले की तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.

बांगलादेशचा फलंदाज अफिफ हुसेनने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. पण आपल्याला षटकार मारल्यामुळे शाहीन खुपच संतापला होता. त्यामुळे त्याने पुढच्याच चेंडूवर थ्रोच्या बहाण्याने आपला राग काढण्याचे काम केले.

आफ्रिदीने क्रिझमध्ये उभ्या असलेल्या आफिकच्या पायावर चेंडू फेकून मारला, त्यानंतर फलंदाज दुखापतग्रस्त होऊन तिथेच खाली पडला. तिथे लगेच पाकिस्तानचा बाबर आझम आला आणि त्याने अफिकला वर उचलण्याचे काम केले. यावेळी तो लंगडत चालत होता. अशात शाहीन सुद्धा त्याला उचलण्यासाठी त्याच्याजवळ आला होता.

आफ्रिदीच्या या कृतीमुळे क्रिकेट चाहते संतापले आहेत. सोशल मीडियावर ते या गोलंदाजाला ट्रोल करत आहे. काही लोक आफ्रिदीवर बंदी घालण्याची मागणीही करत आहेत. याआधी, वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीला आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले होते.

बांगलादेशच्या डावाच्या १७ व्या षटकात ही घटना घडली जेव्हा हसनने फलंदाज नुरुल हसनला बाद केल्यानंतर अनुचित हावभाव केला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सामना असलेल्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी संबंधित ICC आचारसंहितेच्या कलम १ चे उल्लंघन झाले होते.

अशा भाषा, कृती आणि हावभाव फलंदाजाला बाद झाल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करू शकतात, असे म्हणत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, हसनच्या अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे, जो २४ महिन्यांतील पहिला पॉइंट आहे, असे ICC ने एका निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला, आपल्या खेळाडूंना स्वातंत्र्य देणं खुप गरजेचं कारण…
तळीरामांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात दारू झाली स्वस्त, एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी घटवली
‘शेतकऱ्यांची माफी मागून नरेंद्र मोदींनी दाखवली नम्रता; काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे कौतूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.