शाहिद आणि सैफसोबत तु लिफ्ट मध्ये अडकलीस तर? या प्रश्नाला दिले करिनाने मजेदार उत्तर….

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर तिच्या बोलण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. करिना कपूर बोलण्यात अजिबात संकोच करत नाही. तिचे व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य सर्वांपासून लपून नाहीये. करण जोहरने जेव्हा करिनाला शाहिद कपून आणि सैफ अली खानबद्दल प्रश्न विचारला तेव्हा करिनाने असे उत्तर दिले की करण जोहरची बोलतीच बंद झाली.

करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये करण जोहरने करिनाला प्रश्न विचारला की, तु जर शाहिद आणि सैफसोबत लिफ्टमध्ये अडकलीस तर काय होईल. यावर करिनाने उत्तर दिले की, मी जर त्या दोघांसोबत अडकले तर मजा येईल. त्यादरम्यान सैफ आणि शाहिद ‘रंगून’ या चित्रपटात एकत्र काम करत होते. त्याचा संदर्भ घेत करीनानेसुद्धा गमतीने असे म्हटले होते की मला मजा आली असती. रंगुन चित्रपटाची मी नायिका असायला हवी होती.

एक काळ आसा होता ज्यावेळी करिना आणि शाहिदच्या अफेअरबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. हा ब्रेकअप इंडस्ट्रीमधील सर्वात धक्कादायक ब्रेकअप होता. पुढे शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केले आहे, तर करिनाने सैफसोबत.

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…

काय सांगता! एटीएम कार्डशिवाय काढता येणार पैसे; जाणून घ्या सविस्तर 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.