शाहीद अफरीदीची सुंदर मुलगी अडकणार लग्नबेडीत, या प्रसिद्ध क्रिकेटरसोबत ठरले लग्न

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीची मोठी मुलगी तिच्या सौंदर्यामुळे काही दिवसांपुर्वी चर्चेत आली होती. आता तिचे लग्न ठरले आहे आणि ती लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. स्वता शाहीद आफ्रिदीने याबाबत खुलासा केला आहे.

त्याची मुलगी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा काही दिवसांपुर्वी रंगल्या होत्या. सोशल मिडीयावर काही दिवसांपुर्वी दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. आता त्या चर्चांना शाहीद आफ्रिदीने फेटाळून लावले आहे आणि मोठा खुलासा केला आहे.

शाहीद अफरीदीच्या मोठ्या मुलीचा विवाह वेगवान गोलंदाज शाहीन शाह याच्यासोबत ठरला आहे. शाहीन आणि अक्शा आधीपासून रिलेशनशिपमध्ये नव्हते असाही खुलासा आफ्रिदीने केला आहे. तसेच शाहीन आणि अक्शा आपल्या करिअरवर सध्या फोकस करत आहेत.

शाहीद आफ्रिदीची मुलगी अक्शाचा जन्म १५ डिसेंबर २००१ रोजी झाला होता. अक्शा तिच्या सौंदर्यामुळे सोशल मिडीयावर खुप चर्चेत होती. शाहीद आफ्रिदी आपल्या मुलींना प्रसिद्धीपासून दुर ठेवतो. मात्र पाकिस्तान सुपर लीगच्या दरम्यान त्याच्या मुली अनेकवेळा स्टेडियममध्ये दिसल्या होत्या. शाहीदला पाच मुली आहेत. सर्वात मोठी मुलगी अक्शा आहे.

त्यानंतर असमारा, अंशा, अज्वा आणि अरवा अशी त्यांची नावे आहेत. अक्शा सर्वात मोठी मुलगी आहे. दरम्यान, शाहीनने २०१८ मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केले होते. देशासाठी तिन्ही स्वरूपात खेळत आहे. शाहीनने आतापर्यंत पाकिस्तानकडून आतापर्यंत १५ कसोटी, २२ वन डे आणि २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

महत्वाच्या बातम्या
VIDEO: कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं; कोरोना रुग्णही मनसोक्त थिरकले
‘निलंबनासाठी वडील जबाबदार’, पृथ्वी शॉचा खळबळजनक खुलासा
कोरोना झाला तरी चालेल पण लस नको, लसीकरणाला घाबरून गावकऱ्यांनी टाकल्या नदीत उड्या
मलायकाचं वय, घटस्फोट आणि मुलाबाबत व्यक्त झाला अर्जुन कपूर, नात्याबद्दल खुलासा करताना म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.