Shivendrasingh raje : लग्नसराईच्या दिवसांत एकापेक्षा एक समारंभ होत असताना, सातारा (Satara District) येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale Minister) यांच्या कन्येचा शाही लग्नसोहळा संपन्न झाला. अलीकडेच अनेक कलाकार आणि राजकीय घराण्यांचे विवाह सोहळे पार पडले असताना, या समारंभाने विशेष आकर्षण निर्माण केलं.
या विवाहाने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणले. शेंद्रे परिसरातील सजवलेल्या रेड कार्पेट व भव्य शामियानामध्ये झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) आणि अन्य दिग्गजांची उपस्थिती होती. पाहुण्यांनीही सातार्यात उभारलेल्या हा रॉयल सोहळा अनुभवत कौतुकाचीच वचने काढली.
भोसले यांचे पाऊल कौतुकास्पद
लग्नाच्या जल्लोषातही समाजाप्रती असणारी जबाबदारी विसरू नये, हे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं. कन्या ऋणालीराजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुख यांच्या शुभविवाहानिमित्त त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा निधी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी वापरला जाणार असून, उपस्थितांनी या उदात्त कृतीचे मनापासून कौतुक केले.
दिग्गजांची उपस्थिती आणि भव्य सोहळा
शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखाना परिसरात उभारलेल्या भव्य मंडपात राज्यातील अनेक नामवंत मान्यवरांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच विविध क्षेत्रांतील मान्यवर या विवाह सोहळ्यात उपस्थित होते. पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत सापडलेल्या लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी देण्यात आलेला निधी मोठा आधार ठरेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
विविध पक्षांतील मोठी नावे या विवाहात दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित असल्याचे दृश्य विशेष चर्चेत राहिले. वेगवेगळ्या राजकीय विचारांच्या व्यक्ती आनंदाच्या प्रसंगी एकत्र आल्याने वातावरण अधिकच रंगतदार झालं.