एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून त्यांच्या गटातील आमदार शहाजी पाटील हे नेहमीच चर्चेत असलेले नेते आहे. त्यांचा काय झाडी काय डोंगार, काय हाटेल हा डायलॉग खुप व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांना राज्यभरात चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
अशात शहाजी पाटील यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला सांगोला तालुक्यातील नाजरा गावाजवळ अपघात झाला आज दुपारी हा अपघात झाला आहे.
या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. या अपघाताची सांगोला पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सांगोला तालुक्यातील नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी शहाजी बापू पाटील हे गेले होते. तिथून परत येत असताना त्यांच्या पुढे पोलिसांच्या गाडीचा ताफा होता. त्यातील एका गाडीचा अपघात झाला आहे.
पोलिसांच्या एका गाडीला एका मोटरसायकलने धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
शहाजीबापू नाजरा गावाच्या रस्त्यावरुन आपल्या गाड्यांचा ताफा घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांच्या स्कॉर्पियो गाडीला एका दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातत मोटरसायकलस्वार अशोक नाना वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मागे बसलेले नाना अमूने हे गंभीर जखमी झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सकाळी ज्याच्याविरोधात बातमी टाकली, दुपारी त्याच्यात गाडी खाली येऊन झाला पत्रकाराचा मृत्यू
नाना पटोलेंच्या ‘या’ कृतीमुळेच पडले मविआचे सरकार; शिवसेनेची खदखद अखेर आली बाहेर, केले गंभीर आरोप
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, पण ऐनवेळी…; केसरकरांचा धक्कादायक खुलासा