Share

Shah Rukh Khan : पांढरी चादर गुंडाळून मक्केत गेला शाहरुख; पाहून प्रचंड आंनदी झाले हे’ पाकिस्तानी सेलिब्रिटी, म्हणाले..

Shah Rukh Khan : शाहरुख खानने नुकतेच मक्काला जाऊन तीर्थयात्रा केली आहे. शाहरुखची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टीव्ही होस्ट राबिया अनम देखील शाहरुख खानची फॅन झाली आहे, तिने अभिनेत्याचे जोरदार कौतुक केले आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने नुकतेच मक्काला जाऊन तीर्थयात्रा केली आहे. मक्केतील शाहरुख खानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किंग खानला मक्केत पांढरी चादर घातलेला पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शाहरुखच्या तीर्थयात्राची बातमी समोर येताच पाकिस्तानी सेलिब्रिटीही या अभिनेत्याचे चाहते झाले आहेत.

पाकिस्तानची प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि टीव्ही होस्ट राबिया अनमही शाहरुख खानची फॅन झाली आहे. राबिया अनमला मक्केला जाऊन शाहरुख खानने केलेली तीर्थयात्रा इतकी आवडले की तिने किंग खानचे व्हायरल फोटो शेअर केले आणि खास कौतुक केले.

राबिया अनमने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शाहरुख खानच्या मक्का येथील तीन फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले – हे पाहून मला इतका आनंद का झाला? केवळ पाकिस्तानी सेलिब्रिटीच नाही तर तिथले लोकही किंग खानचे चाहते झाले आहेत.

खरंतर शाहरुख खान सध्या सौदी अरेबियात आहे. नुकतेच त्याने त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाचे शूटिंग तेथे पूर्ण केले. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर शाहरुख तीर्थयात्रा करण्यासाठी मक्का येथे पोहोचला. मक्का शरीफ येथून तीर्थयात्रा करत असलेल्या अभिनेत्याचे व्हिडिओ आणि फोटो शाहरुख खानच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आले होते.

शाहरुख खान पांढरी चादर घातलेला दिसत आहे. कोविड नियमांचे पालन करत शाहरुखनेही मास्क घातला आहे. मक्का शरीफमधून समोर आलेले शाहरुखचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. तत्पूर्वी, त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून शाहरुख खानने चाहत्यांना सांगितले की, त्याच्या डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. शूटिंग पूर्ण झाल्यावर शाहरुखने टीममधील सर्व लोकांचे आभारही मानले.

सौदी अरेबियाच्या संस्कृती आणि चित्रपट मंत्रालयाचेही आभार मानले गेले. डंकी व्यतिरिक्त चाहते शाहरुख खानच्या पठाण आणि जवानचीही वाट पाहत आहेत. शाहरुखला मक्कामध्‍ये पाहिल्‍यानंतर चाहते काय म्हणत आहेत – एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे? बाय द वे, शाहरुखची ही स्टाइल तुम्हाला किती आवडली?

महत्वाच्या बातम्या
Bihar : ऑर्केस्ट्रात गाणी वाजवायचा, कुठेही गेला की लग्न करून यायचा! पकडल्यावर निघाल्या 6 बायका
akshaya deodhar : प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट..; लग्नात पाठकबाईंनी घेतला भलामोठा उखाना, पहा व्हिडीओ
Udddhav thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वच्या सर्व जागा जिंकत केला भाजप शिंदे गटाचा सुपडा साफ; पहा कुठे घडला हा चमत्कार

आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now