शाहरूख खानला वाटत होते; राम मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदुंनी करावी

नवी दिल्ली | देशाचे ४७ वे सरन्यायाधीश असलेले शरद अरविंद बोबडे काल सेवानिवृत्त झाले. बोबडे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या प्रकरणांवर निकाल दिला. यातील एक प्रकरण म्हणजे राम जन्मभूमी प्रकरण.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात निरोप समारंभ पार पडला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी एक मोठा खुलासा केला आहे. राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी अभिनेता शाहरूख खानने मध्यस्थी करावी असं बोबडे यांना वाटत होतं.

विकास सिंह म्हणाले की, माझे आणि अभिनेता शाहरूख खानचे मैत्रीपुर्ण संबंध आहेत. हे बोबडे यांना माहित होतं. बोबडे मला म्हणाले होते की अयोध्या प्रकरणाचा मध्यस्थांमार्फत तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये सहभागी होण्यास शाहरूखला विचारायला लावले होते.

सिंह यांनी याबाबत शाहरूख खानशी चर्चाही केली होती. शाहरूखने तयारीही दर्शवली  होती. मंदिराची पायाभरणी मुस्लिमांकडून तर मशिदीची पायाभरणी हिंदुंनी ठेवावी असं शाहरूख म्हणाला होता.  मात्र शाहरूखने मध्यस्थी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्याने व्यक्त केलेली इच्छा कौतूकास्पद होती. असं सिंह म्हणाले.

दरम्यान शरद बोबडे यांच्या निवृत्तीनंतर देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमणा यांनी शपथ घेतली आहे. दिल्ली हायकोर्टात एन. व्ही. रमणा यांनी मुख्य न्यायमुर्ती म्हणून कामगिरी बजावली आहे. पुढील १६ महिने ते देशाचे सरन्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
ऐन कोरोनाच्या संकटात मुकेश अंबानीची ब्रिटनमध्ये फुल्ल टू शॉपिंग; ५९२ कोटींचा रिसॉर्ट केला खरेदी
महाराष्ट्राच्या मदतीला धावला ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री; राज्याला दिले ३०० व्हेंटीलेटर्स
आमचा ट्रायो तुटला… ; सहकलाकाराच्या जाण्याने हळहळलेल्या जेठालालने लिहीली भावूक पोस्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.