शाहरूख खान म्हणजे चांगल्या वर्तन कसे असावे याचे आदर्श उदाहरण; अभिनेत्रीचे वक्तव्य

मुंबई | 3 ऑक्टोबरला क्रूझवरील ड्रग्स पार्टीत बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा अवघ्या 23 वर्षांचा मुलगा आर्यन खान पकडला गेला. त्यानंतर आज 19 दिवस झाले तरीही त्याचा तुरुंगवास संपायची चिन्हे दिसत नाहीयेत. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी शाहरुखने दिग्गज वकिलांची फौज लावली आहे. विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यांच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे आणि एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावर अनेक अभिनेते शाहरुखला पाठिंबा देत असताना अभिनेत्री स्वरा भास्करने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.

स्वरा ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिच्या पोस्टद्वारे अनेक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडत असते. नुकताच स्वराने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. चांगले वर्तन कसे असावे याचे शाहरुख खान एक उदाहरण आहे. माझ्यासाठी, एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याच्याकडे सर्व गुण आहेत. वैयक्तिकरित्या तो माझ्यासाठी प्रेरणाही आहे. त्याच्यासाठी आणि गौरीसाठी मी प्रार्थना करत आहे, असे ट्वीट स्वराने केले आहे.

या पोस्टवर स्वराला बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोकांनी तिच्या ट्विटला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर अनेक लोक आपली वेगवेगळी मते व्यक्त करतानाही दिसले आहेत. दुसरीकडे अनेकांनी स्वराला ट्रोलही केले आहे. याआधीही स्वराने आर्यन खान प्रकरणाबद्दल आपले मत एका पोस्टद्वारे व्यक्त केले आहे.

एनसीबीने अटक केल्यापासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान याला पाठिंबा दिला आहे. यामध्ये हृतिक रोशन , रवीना टंडन , पूजा भट्ट आणि हंसल मेहता यांचा समावेश आहे. सलमान खान त्याच्या कठीण काळात शाहरुखच्या पाठीशी उभा आहे आणि आर्यनच्या अटकेनंतर तो शाहरुखच्या मन्नत बंगल्यात अनेक वेळा दिसला आहे .

सुनील शेट्टी, मिका सिंग, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि सुझान खान हे देखील शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, त्यांना वाटते की आर्यन खानला लक्ष्य केले जात आहे कारण तो सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आहे.

७ तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. ही न्यायालयीन कोठडीची मुदत काल संपली असून त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.