बॉलीवूड एकवटलं! रिपब्लिकन टिव्ही, टाईम्स नाऊ विरोधात सलमान, शाहरुख, आमीर कोर्टात 

मुंबई | मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या TRP घोटाळा प्रकरणानंतर माध्यमांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. याचबरोबर या आधी देखील बेजाबदार बातम्या देणे तसेच वार्तांकन याबाबत अनेकांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ वर आक्षेप घेतला होता. आता हे प्रकरण आणखी चिघळल आहे.

याबाबत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात या सर्वांनी हे मोठे पाऊल उचलले आहे.

आज दिल्ली उच्च न्यायालयात रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचे काम केल्याची तक्रार या याचिकेत सर्वांनी केली आहे. बेजबाबदार बातमीदारीचा आरोप या प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिकेत लावला आहे. याचबरोबर बॉलिवूडविरूद्ध बेजबाबदार, अपमानास्पद आणि बदनामीकारक टीका प्रसिद्ध करू नये, अशी विनंती या असोसिएशनने कोर्टाला केली आहे.

वाचा कोणत्या-कोणत्या प्रॉडक्शन हाऊसेसनी केली याचिका दाखल…
यामध्ये, द प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया, द सिने ऐंड टीवी आर्टिस्ट एसोसिएशन, द फिल्म ऐंड टीवी प्रोड्यूसर्स काउंसिल, स्क्रीनराइटर्स एसोसिएशन, आमिर खान प्रोडक्शंस, ऐड-लैब फिल्म्स, अजय देवगन फिल्म्स, आंदोलन फिल्म्स, अनिल कपूर फिल्म ऐंड कम्युनिकेशन नेटवर्क, अरबाज खान प्रोडक्शंस, आशुतोष गोवारिकर प्रोडक्शंस, बीएसके नेटवर्क ऐंड एंटरटेनमेंट, केप ऑफ गुड फिल्म्स

क्लीन स्लेट फिल्म्स, धर्मा प्रोडक्शंस, एमे एंटरटेनमेंट ऐंड मोशन पिक्चर्स, एक्सेल एंटरटेनमेंट, फिल्मक्राफ्ट प्रोडक्शंस, होम प्रोडक्शन, कबीर खान फिल्म्स, लव फिल्म्स, मैकगफिन पिक्चर्स, नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट, वन इंडिया स्टोरीज, राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स

रेड चिलीज एंटरटेनमेंट, रिलायंस बिग एंटरटेनमेंट, रील लाइफ प्रोडक्शंस, रोहित शेट्टी पिक्चर्स, रॉय कपूर प्रोडक्शंस, सलमान खान वेंचर्स, सोहेल खान प्रोडक्शंस, सिख्या एंटरटेनमेंट, टाइगर बेबी डिजिटल, विनोद चोपड़ा फिल्म्स, विशाल भारद्वाज फिल्म और यशराज फिल्म्स, यांचा समावेश आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारने आणले पशू आधार कार्ड! जाणून घ्या कसा फायदा होणार शेतकऱ्यांना
लाॅकडाऊनमध्ये ट्रायपाॅड मिळत नव्हता मग जुगाडूने घरीच बांबूपासून बनवला ट्रायपाॅड; जाणून घ्या कसा..
परतीचा पाऊस शेतकऱ्यांना रडवणार? पुढील आठवडाभर अतिमुसळधार पावसाचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.