केवळ तीन वर्षांची होते तेव्हाच माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते; ‘या’ अभिनेत्रीचा भयंकर गौप्यस्फोट

मुंबई । सध्या बॉलीवूडमधून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. लैंगिक अत्याचार, पॉर्न व्हिडिओ यामुळे बॉलीवूडमधील अनेक नावे समोर येत आहेत. असे असताना आता बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला लैंगिक शोषणला सामोरे जावे लागले होते.

यामुळे आता बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. फातिमा सना शेखने एका मुलाखतीत कास्टिंग काउच आणि बालपणातील गैरवर्तन यावर खुलासा केला होता. तिने हा धक्कादायक अनुभव शेअर केला. ती ३ वर्षांची असतानाच तिचा विनयभंग झाला होता, स्वतः तिने याबाबत माहिती दिली आहे.

पण ती म्हणाली, आता मला आशा आहे की, काळ बदलला आहे. आता देशात आणि जगभरातील लोकांमध्ये लैंगिक छळाबाबत जागरूकता वाढली आहे. पूर्वी असे म्हटले होते की, या सगळ्याबद्दल बोलू नका. लोकांचा गैरसमज होईल, पण आता सगळेजण यावर बोलतात.

तसेच कास्टिंग काउचबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, मी कास्टिंग काऊचचाही सामना केला. एकदा असे म्हटले गेले की, तुम्ही सेक्स कराल तरच तुम्हाला काम मिळेल. फातिमा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला दररोज तिच्या स्टाईल आणि सौंदर्यासाठी प्रशंसा मिळते.

सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. ती नवीन फोटोशूट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. यामुळे आता तिची चर्चा सुरू झाली आहे. बॉलीवूडमध्ये अनेकांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. अनेकांनी याबाबत पुढे येऊन बोलण्यास सुरुवात केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.