अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोपाने खळबळ; अभिनेत्रीने मागितली मोदींची मदत

मुलुखमैदान: बॉलीवुड इंडस्ट्रीचे प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यप सोशल मीडियाद्वारे पीएम नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने करत असलेल्या वादग्रस्त टिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

एका तेलगू न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला असून ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. अभिनेत्री पायल घोष हिने आपली मुलाखत ट्विटरवर शेअर करत अनुरागवर आरोप केले आहेत.

अनुराग कश्यपवर कारवाई करा आणि या क्रिएटिव्ह माणसाच्या चेहऱ्यामागच्या राक्षसाला समोर आणा, असे आवाहन तिने पीएमओ, पंतप्रधान मोदी यांना केले. तसेच यामुळे माझे नुकसान होऊ शकते आणि माझा जीव देखील धोक्यात येऊ शकतो, कृपया मदत करा, असे आवाहनही पायल घोष हिने केले.

दरम्यान यावर दिग्दर्शन अनुराग कश्यपनेही ट्वीट करून आरोप फेटाळून लावल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्रीचे आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगा असं अनुराग कश्यपने अभिनेत्रीला सुनावलं आहे.

अजून बऱ्याच टीका बाकी आहेत. ही फक्त सुरुवात आहे. अनेक जण मला शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. माहीत नाही कधी कोण कुठे कशापद्धतीने टीका आणि आरोप करेल. अभिनेत्रीने केलेले आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगायला हवी असंही अनुरागनं ट्वीटमध्ये म्हटले आहे. अभिनेत्री पायल घोषने केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने ट्वीट करून खंडन केले.

बॉलीवूडमध्ये Me Too चळवळ पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. गेल्या महिन्यात चित्रपट निर्माते साजिद खान याच्यावर मॉडेलने गंभीर आरोप केले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.