सावधान! तुम्हाला पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !

मुंबई : अलीकडे सायबर गुन्हेगारी वाढत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून एक वेगळ्या प्रकारचा सायबर गुन्हा चर्चेत आला आहे. या सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे सेक्सटोर्शन. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या एका सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या या सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश केला असून तिघांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणात तिघांना राजस्थान, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधून अटक केली.

तिघेही आरोपी आठवी आणि दहावीचे शिक्षण घेतलेले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात एका बड्या राजकीय नेत्याला आरोपींनी लक्ष्य केल्यानंतर सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामध्ये आयएएस, आयपीएस, आमदार, खासदार आणि अनेक महत्वाच्या लोकांचा समावेश असतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम सोशल मीडियावर एका सुंदर मुलीचा फोटो ठेवून एक बनावट अकाऊंट उघडण्यात येते. त्याच्या माध्यमातून या प्रतिष्ठीत लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि संबंध वाढवले जातात. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात पूजा शर्मा या फेसबुकवरील अकाऊंटच्या नावाने लोकांना फसवल जात होतं.

दरम्यान, मुंबईचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पूजा शर्मा या नावाची तब्बल १५१ फेसबुक अकाऊंट आणि काही टेलिग्राम चॅनेल्सही बॅन करण्यात आले आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या
खुशखबर! ‘या’ बँकेची धमाकेदार बचत योजना; फक्त ५ रुपयांमध्ये उघडा खातं आणि मिळवा १ लाख
संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल; वाचा नेमकं काय त्या मेसेजमध्ये
शालूचा इश्किया अंदाज एकदा पाहाच; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.