Share

मुंबईत पोलिसांनी उद्ध्वस्त केले मोठे सेक्स रॅकेट, जबरदस्तीने तरुणींच्या शरीराचा व्हायचा सौदा

mumbai-sex-racket

मुंबई पोलिसांनी एका मोठया सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबई जवळ असणाऱ्या पनवेलमध्ये खंडेश्वर पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी पीडित तरुणींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होते. पोलिसांनी एकूण सहा पीडित तरुणींची सुटका केली आहे.( sex racket destroyed by Mumbai police)

अटक करण्यात आलेले आरोपी परराज्यातील रहिवासी आहेत. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना ५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील एका इमारतीत काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने त्या ठिकाणी छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी दोन दलालांना अटक केली आहे.

या छापेमारीत पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून सहा तरुणींची सुटका केली आहे. या संबंधित तरुणींना उत्तर प्रदेश, राजस्थान, आगरा आणि दिल्ली परिसरातून विविध ठिकाणाहून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी तरुण हे पीडित तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना आपल्या जाळयात ओढत होते.

आरोपी ग्राहकांकडून मोठी रक्कम घेत होते. ज्यामधून आरोपींना कमिशन मिळत होते. या प्रकारची माहिती मिळताच खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पीडित तरुणींची सुटका केली असून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी बिहार आणि दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. या सेक्स रॅकेट,मध्ये आणखी कोण- कोण सहभागी होते, याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात अशा प्रकारचे अनेक सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
चुकूनही करू नका ‘या’ चुका, रात्री गाडी चालवताना लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या सेफ्टी टिप्स
वयाच्या 52 व्या वर्षी सलमान खानची ही अभिनेत्री झाली बोल्ड, स्विमींग पुलमधील फोटो झाले व्हायरल
पाकिस्तान झाला मालामाल, गुजरातपासून ६० किमी अंतरावर चीनच्या कंपनीला मिळाले ‘ब्लॅक गोल्ड’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now