सेक्स एज्युकेशनच्या ‘त्या’ मिल्कशेकच्या व्हिडिओला तज्ज्ञांचा आक्षेप, अखेर सरकारने हटवला व्हिडिओ

सध्या देशातच नाही, तर जगभरात लैंगिक शोषण, बलात्काराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी मुलांना योग्य वयात सेक्स एज्युकेशन देणे गरजेचे असते.

त्यासाठी आता ऑस्ट्रेलियामध्ये सरकारकडून एक मोहीम राबवण्यात आली आहे. पण त्यासाठी मुलांना दाखवण्यात आलेला मिल्क शेकच्या व्हिडिओने एकच गोंधळ उडाला आहे.

सेक्स एज्युकेशनच्या या व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे अखेर ऑस्ट्रेलिया सरकारला माघार घ्यावी लागली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया सरकरारने हा व्हिडिओ अधिकृत वेबसाईटवरुन काढून टाकला आहे.

सध्या ऑस्ट्रेलियात लैंगिक शिक्षणाची मोहीम सुरु असून १४ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना लैंगिक शिक्षणाविषयी माहिती दिली जात आहे. त्यामुळे सेक्स एज्युकेशन संबंधित The good Society नावाच्या वेबसाईटवर ३५० व्हिडिओ, स्टोरीज आणि पॉडकास्ट अपलोड केले गेले आहे.

अशात या वेबसाईटवर असलेल्या एका मिल्कशेकच्या व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये किशोरवयीन मुलगी आपल्या बॉयफ्रेंडच्या सहमतीशिवाय त्याच्या चेहऱ्यावर मिल्कशेक लावते. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शार्क माश्यासोबत पोहण्यासाठी घाबरत आहे, तर तिचा बॉयफ्रेंड तिला आग्रह करत आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून जोडीदाराच्या मनाविरुद्ध काही करु नका, असे सांगण्यात आले आहे. पण संबंधित प्रकार स्पष्टपणे सांगु शकता येतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हा प्रकार जितका स्पष्टपणे सांगाल तितकं मुलांना लवकर समजेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

हे व्हिडिओ उलटअर्थी आणि शंका निर्माण करणारे आहे. त्यामुळे अनेकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे अखेर लोकांचा वाढता आक्षेप बघता ऑस्ट्रेलिया सरकारने हा व्हिडिओ अधिकृत वेबसाईटवरुन हटवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे; व्हिडिओ पाहून हैराण झालेला पती शाहिद कपूर म्हणाला…
कोरोनामुळं आमच्या आयुष्याची वाट लागलीय आणि इथं लोकं आयपीएल खेळतायत; अभिनेत्री भडकली
रेमडेसिवीर टंचाईचे खापर अभिमन्यु काळेंवर फोडणाऱ्या ठाकरे सरकारवर सेना नेत्याचीच सडकून टिका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.