७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदींचा गुण मला सर्वांत जास्त आवडतो: प्रीतम मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रीतम मुंडे यांनी बीड राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज्य सरकारवर चांगलच टीकास्त्र सोडलं आहे. त्या म्हणाल्या, की आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त, मी आपल्या आवाहन करू इच्छिते, अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून, आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ. अशी सणसणीत टीका प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर साधला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदीजींचा आजवरचा सगळ्या आवडता माझा गुण म्हणजे गेल्या 7 वर्षांत त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकार परिषद घेतली नाही, याविषयी त्यांच्यावर टीका देखील होते.

पण जो माणूस आपलं काम, आपलं ध्येय स्पष्ट समोर असताना काम करत राहतो, आपल्या मार्गावरती तो मार्गक्रमण करत राहतो. त्यावेळी त्याच्याबद्दल चांगलं बोलणारे जर 10 लोकं असतील तर टीका करणारेही दोन लोकं असतात. पण त्या टीकेने विचलीत न होता, आपण आपलं काम करत राहणं महत्त्वाचं असतं, असं त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी खड्ड्यावरून नाव न घेता धनंजय मुंडें आणि स्थानिक आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या “कोण रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. उगीचच कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरायचं आणि आपणच काम केल्याचा आव आणायचा.

याचा एक नवीन प्रयोग जिल्ह्यात सुरू झाला आहे. बातम्या काढतात, या नॅशनल हायवेचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न. मात्र जो रस्ता यांच्या अधीपत्त्यात येत नाही त्या रस्त्याच्या बातम्या येतात. याउलट श्रेय घेणारे आमदार भाजपचे असते तर मी समजून घेतले असते.

मात्र, राष्ट्रवादीचे हे आमदार केंद्रात सत्ता भाजपची आणि रस्त्यावर खड्डे पडले, की म्हणतात खासदारांना विचारा आणि दुरुस्तीचा निधी आला की म्हणतात आम्ही आणला. अशा दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांना, जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

 

महत्वाच्या बातम्या
खाणीत काम करताना मजुराला भेटला तब्बल ४० लाखांचा हिरा, एका रात्रीत झाला लखपती
महावितरणाच्या वीज ग्राहकांसाठी खुषखबर! सौरउर्जा पॅनेल बसवण्यासाठी केंद्राकडून मिळणार ४० टक्के अनुदान
नक्की चाललंय काय? शिवसेना युतीचे संकेत देत असताना देवेंद्र फडणवीस- जयंत पाटलांचा एकाच गाडीत प्रवास
राम-लखन चित्रपटातील या अभिनेत्रीने पार्टीमध्ये कापून घेतली होती हाताची नस, किस्सा वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.