सात टाके पडल्यानंतरही मागे नाही हटला हा पठ्ठ्या, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, पण…

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चुरस वाढली आहे. अनेक भारतीय खेळाडू आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकत आहेत. भारताचा ९१ किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर सतीश कुमारचा मात्र पराभव झाला. उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्वविजेता बखोदिर जलोलोवने सतीशचा पराभव केला.

उझबेकिस्तानच्या बॉक्सरने सतीशचा ५-० असा पराभव करून आपले पदक निश्चित केले. तत्पूर्वी, त्याने आपला उप-उपांत्यपूर्व सामना अझरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेवविरुद्ध एकतर्फी जिंकला.
सतीश कुमार मागच्या सामन्यात जखमी झाला होता.

यामुळे त्याचे रिंगवर खेळणे देखील निश्चित नव्हते. जमैकाच्या रिकार्डो ब्राउनविरुद्धच्या सामन्यात सतीशच्या हनुवटीवर आणि उजव्या डोळ्याला मार बसला होता. यानंतर त्याला ७ टाके पडले. सतीशने हा सामना ४-१ असा जिंकला होता.

टोकियो ऑलिम्‍पिकमधील बॉक्‍सिंगमध्‍ये भारताचे पाच खेळाडू होते. मनीष कौशिक, विकास कृष्‍णन आणि आशीष कुमार हे पहिल्‍याच फेरीत बाद झाले होते. अमित पंघाल हा उपांत्‍यपूर्व फेरीत पराभूत झाला. उर्वरीत चौघेही ऑलिम्‍पिकमधून बाहेर पडल्‍याने सतीशकुमारकडून अपेक्षा होत्‍या.

असे असताना मात्र तो लढला, तो मोठ्या प्रमाणावर जखमी झाला होता. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. यामुळे त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्याच्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले. त्याने सर्व भारतीयांची मने जिंकली.

ताज्या बातम्या

पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत?, पोलिसांच्या हाती लागला ‘हा’ महत्वाचा पुरावा

काय सांगता! या वेबसाईटद्वारे २ रुपयांचे नाणे तुम्हाला मिळवून देईल ५ लाख रुपये, ते कसे, जाणून घ्या..

शिवसैनिक तापले! मुंबई विमानतळावर लावलेल्या‘अदानी एअरपोर्ट’फलकची जोरदार तोडफोड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.