“शिवछत्रपतींचा आशीर्वाद, आदर्श व त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जनतेची सेवा करतोय”

दिल्ली । भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. यावेळी उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेतला. उदयनराजे भोसले यांना इतर स्लोगन न वापरण्याची समज दिली. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवछत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, आदर्श व त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा समाजकारणाच्या माध्यमातून करत आलो.

यापुढे फक्त सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करून राज्यसभेची संधी लोकहितासाठी वापरणार. जय भवानी, जय शिवराय असे ट्विट उदयनराजे भोसले यांनी केले.

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा काल दिल्लीत पार पडला. उदयनराजेंनी दिलेल्या घोषणेमुळे व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली.

शपथ संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी जय हिंद जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. यावर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.