मतिमंद दिराची सेवा करण्याचा विडाच जून ‘तिने’ उचललाय, वाचा गीताची कहाणी…

अहमदनगर । मोठं कुटुंब म्हटले की भांड्याला भांड लागणारच अस म्हटले जाते. त्याला कारण देखील तसेच असते. घरात काही ना काही कारणाने कुजबुज सुरूच असते. एखाद्या घरात मतीमंद व्यक्ती असेल तर त्यांची कामे करण्यावरून देखील वाद होत असतात.

या जमान्यात मात्र यालाही काही सुना अपवाद आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गीता अण्णा काळे. आपल्या मतीमंद दिराची दैनंदिन सर्व कामे त्या मनोभावे करतात. ऐवढेच नाही तर आपल्या या 32 वर्षाच्या दिराची दाढी देखील त्या करतात. एखादी बहीण सुद्धा त्याच्याप्रमाणे भावाची सेवा करणार नाही. असे काम त्या करत असतात.

गीता काळे या करमाळा जिल्हा सोलापूर तालुक्यातील विहाळ येथील आहेत. सासू, सासरे, दीर, दोन मुले व पती असे त्यांचे कुटुंब आहे. पती अण्णा हे शिक्षक आहेत. गीता यांचा २०१० मध्ये विवाह झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेले ताकविकी हे त्यांचे माहेर आहे. त्यांचे एकत्रित कुटुंब आहे.

अण्णा काळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अण्णा काळे यांचे बंधु हरिभाऊ ऊर्फ संतोष हे मतीमंद आहेत. अनेकदा विवाह जमवताना दिव्यांग मुलांमुळे त्यांचे लग्न जमत नव्हते. मात्र त्यांनी कधी त्यांची खरी परिस्थिती लपवली नाही.

दरम्यान २०१० ला त्यांचा गीता यांच्याशी विवाह झाला. हरीभाऊ यांना सहा वर्षाचे असताना ताप आला. करमाळ्यातील एका रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला तापातच इंजेक्शन दिले. तेव्हापासून अनेक उपचार करून देखील ते मतिमंद झाले. गीताला त्यांनी सांगितले तर त्या म्हणाल्या माझा भाऊ असा असता तर? असेही त्या म्हणतात.

गीता या विवाह झाल्यापासून हरिभाऊच्या दैनंदिन कामे करतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर हरीभाऊला ब्रश करायला सांगणे. अंघोळी घालणे, त्यांची कपडे धुणे याशिवाय त्यांची दाढी करणे हे सुद्धा अगदी आईप्रमाणेच त्या त्यांची कामे करतात.

हरिभाऊ मतिमंद असल्याने त्यांची दाढी कटिंग करताना अनेकजण त्यांची चेस्टा करत असत. यामुळे त्यांनी घरीच हे काम करण्याचे ठरवले. न लाजता त्या सर्व कामे करत असतात. त्यांनी जणू आयुष्यभर दिराची सेवा करण्याचे व्रतच घेतले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.