पुणे । सध्या कोरोना लस कधी येणार याची उत्सुकता सर्व देशवासियांना लागली आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस तयार होत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दौरा करून लसीचा आढावा घेतला. यामुळे आता लस येण्याची शक्यता वाढली आहे.
या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी हैदराबाद येथील एका रुग्णाने ‘कोविशील्ड’ लस घेतल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम झाल्याचा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यापोटी 5 कोटी रुपये नुकसान भरपाई त्याने मागितली आहे. मात्र सीरम संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
याबाबत सीरमकडून सांगण्यात आले की, रुग्णाला आमची सहानुभूती आहे. कोव्हिशिल्ड लशीची चाचणी आणि त्याची सध्या बिघडलेली प्रकृती याचा काहीही संबंध नाही. विनाकारण तो सीरम संस्थेला दोषी धरत असून असे चुकीचे आणि गंभीर आरोप करणाऱ्या या व्यक्तीवर कंपनीकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा करण्यात आला आहे.
आता मात्र ही लस सुरक्षित आहे की नाही यावरून देखील चर्चा सुरू झाली आहे. कंपनीकडून मात्र ही लस सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.
शनिवारी नरेंद्र मोदी यांनी सिरमचा भेट दिली. तसेच अहमदाबाद आणि हेद्राबादमध्ये देखील त्यांनी भेट देऊन लसीचा आढावा घेतला. सरलारकडून लसीकरणाची तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे.