देशातील लसीच्या तुडवड्याला केंद्र सरकारच जबाबदार; सिरम इन्स्टिट्युटने केला खळबळजनक आरोप

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. दिवसाला साडे तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण भेटत आहे. तसेच हजारो रुग्णांचा मृत्यु होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

सध्या तिसऱ्या टप्प्यतील लसीकरण सुरु असून १ मेपासून देशातील १८ वर्षांवरील नागरीकांनाही कोरोनाची लस देण्याचे सुचना केंद्राने दिल्या आहे. अशात देशभरात लसीचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी १८ वर्षांवरील नागरीकांना अजून तरी लस देण्यास सुरुवात झालीली नाही.

आता देशातील कोरोना लसीच्या तुटवड्यावर सिरम इन्स्टिट्युटने प्रतिक्रिया दिली आहे. केंद्राने लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सचा विचार न करता १८ वर्षांवरील सर्व नागरीकांच्या कोरोना लसीकरणाला परवानगी दिली आहे, असे सिरम इन्स्टिट्युटने कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.

भारतात किती लसी शिल्लक आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्स जाणून न घेताच केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरीकांच्या कोरोना लसीकरणाला परवानगी दिली आहे, असे सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.

तसेच देशाने जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या गोष्टींचे आणि नियमांचे पालन करायला हवे. त्यानुसार लसीकरणाबाबत काही निर्णय घ्यायला पाहिजे, असेही सुरेश जाधव म्हटले आहे.

आपण यातून एक धडा घ्यायला पाहिजे. आपण एखादी वस्तुची उपलब्धता पाहूनच त्याच्या वापराबाबत निर्णय घेतला पाहिजे. तसेच लसीकरण गरजेचे आहे, पण अनेकांना लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे नागरीकांनी सावध राहून, आपली काळजी घेतली पाहिजे, असेही सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीने पोहत आला दुसऱ्या देशात, सैनिकांनी पकडताच म्हणाला…
अरे बापरे! कोरोनामुळे नवरदेवाला चक्क कलर देण्याच्या रोलरनीच लावली हळद; पाहा व्हिडिओ
८ महिन्याची गरोदर महिला उचलतेय तब्बल १५० किलो वजन अन् करतेय हेवी वर्कआऊट; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.