मुंबई | भारतात सीरमच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आता लवकरच कोरोना लशीकरणाला सुरुवात होणार आहे.
अशातच पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर येत आहे. याचबरोबर लशीच्या एका नगाची किंमत २०० रुपये इतकी असणार असल्याची माहिती सीरम इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
१६ जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार…
देशभर येत्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज ३ कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल २७ कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘विरुष्का’च्या घरी नव्या पाहुणीचं आगमन; विराटने दिली आनंदाची बातमी
सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्याचा सल्ला; शेतकरी नेते म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला घेतलं फैलावर; ‘कृषी कायदे स्थगित करा नाहीतर…’