मोठी बातमी! सिरमने मागितली कोरोना लसीची आपत्कालीन परवानगी, यादिवशी मिळणार लस

पुणे । देशात कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीच्या आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यावर परवानगी मागितली आहे. यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लसीच्या वापराची अधिकृतता मिळवणारी पहिली भारतीय कंपनी असणार आहे.

सीरमने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून त्यांच्या कोरोना लसीच्या म्हणजेच ‘कोविशिल्ड’ च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे. आपत्कालीन वापरासाठी लसीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी जनतेच्या हिताचा हवाला दिला आहे.

यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यास आणखी मदत होईल असे सीरमने म्हटले आहे. त्यामुळे यावर आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लक्षणे असणारे रुग्ण आणि कोरोनाचा गंभीर धोका असणाऱ्या रुग्णांवर कोविशिल्ड ही अत्यंत प्रभावी आहे.

सीरमने सादर केलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या चार रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. कोविशिल्ड लस चाचणीमध्ये 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे लवकरच ती प्रत्येकासाठी उपलब्ध होईल.

यासाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर 10 कोटी डोसच्या करारावर सह्या झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. यामुळे कोविशिल्डचे तब्बल 100 दशलक्ष डोस हे जानेवारीपर्यंत तर शेकडो दशलक्ष डोस फेब्रुवारीच्या अखेरीस तयार करता येतील अशी माहिती आदर पुनावाला यांनी दिली होती.

यामुळे नवीन वर्षात सर्वसामान्य लोकांना ही लस मिळण्याची शक्यता आहे. ही लस भारतीय लोकांना आणि कोरोना योद्धांना सर्वात आधी दिली जाईल. असेही सांगण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.