Share

‘संभाजी भिडेंना दंगलीच्या गुन्ह्यातून क्लीन चिट देण्यात जयंत पाटलांचा हात’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. संभाजी भिडे(Sambhaji Bhinde) यांचा भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणताही सबळ पुरावा सापडला नसल्याचे पुणे पोलिसांनी नमूद केले आहे. राज्य मानवी हक्क आयोगाला लिहिलेल्या पत्रात पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.(Serious allegations on jayant patil by Prakash Ambedkar)

त्यानंतर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून संभाजी भिडे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. या सर्व घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडेंना क्लीन चिट देण्यात जयंत पाटलांचा हात आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राष्ट्रवादीमधील जयंत पाटील संभाजी भिडेंच्या पाय पडतात. त्यामुळे सूत्र कुठून हलली असतील हे आपल्या लक्षात येतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या प्रकरणात एक दावा केला होता. हे सगळं प्रकरण फसवणुकीचं आहे. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे माझ्याजवळ असल्याचे शरद पवारांनी सांगितले होते.”

“त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन गट झाले आहेत”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. “भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ३९ जण दोषी आहेत. या सर्वांनी कोणाच्या सांगण्यावरून हिंसाचार केला. कोणत्याही गुन्ह्याला मायबाप असतो. त्याच्यामागे काही हेतू असतो. हा हेतू समोर यायला हवा”, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ” तपास अधिकाऱ्याने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संभाजी भिडेंना दोषी ठरवण्यात आलं आहे. चौकशी संदर्भातील जी पत्रं आहेत ती न्यायालयात सादर करण्यात येतील. त्यामुळे या प्रकरणात परत चौकशी झाली तर तपास अधिकारी अडचणीत येतील”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात चौकशी करणाऱ्या आयोगासमोर हजर राहणार आहेत. यावेळी शरद पवार या प्रकरणातील महत्वाची कागदपत्रे चौकशी आयोगासमोर सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आज मिलिंद एकबोटे देखील चौकशी आयोगासमोर हजर राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
मुख्यमंत्री पदावर ब्राम्हण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याची चर्चा
अखेर सरकार राज ठाकरेंसमोर झुकलेच! अजित पवारांनी धार्मिक स्थळांना केले ‘हे’ आवाहन
लहानपणी क्रिकेट खेळण्यावरून मारायचे वडील, आता IPL मधून कमावले करोडो रुपये, वाचा यशोगाथा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now