Share

शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचे गंभीर आरोप; म्हणाले, ‘राष्ट्रवादीने शिवसेना संपवली’

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. दिवसेंदिवस या बंडखोरीत सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. आता शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही बंडखोरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्रामुळे चर्चांना उधाण आले आहे.(Serious allegations of Shiv Sena MP Prataprao Jadhav)

या सर्व घटनांवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव(Prataprao Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीने शिवसेना संपवली आहे, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, “शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जात नाही. त्यांना त्रास दिला जातोय, अशा बातम्या मी ऐकल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा स्वभाव साधा आहे. त्यांच्या साध्या स्वभावाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला आहे. राष्ट्रवादीने शिवसेना संपवली आहे”, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे.

यावेळी शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, असा सल्ला अप्रत्यक्षरित्या दिला आहे. ” गेल्या २५ वर्षांमध्ये महाराष्ट्रात भाजप किंवा शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या मदतीने वाढले आहेत. दोन्ही पक्षांची विचारसरणी एक आहे. दोन्ही पक्षांची युती देखील फार जुनी आहे. दोन्ही पक्षांची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे”, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे.

यावेळी शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना तुम्ही देखील नॉट रिचेबल’ होणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, “मी एक शिवसैनिक आणि शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे. काल वर्षावर खासदारांची कोणतीही बैठक बोलवण्यात आली नव्हती. मी ‘नॉट रिचेबल’ वगैरे काही नाही. मी ‘नॉट रिचेबल’ कधीच राहणार नाही.”

एकनाथ शिंदे यांनी यांच्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थान सोडले आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ज्यावेळी लोकांना उद्धव ठाकरे संपले आहेत असे वाटले, त्यावेळी नेमकं उलटंच घडलं! पहा त्यांचा रेकॉर्ड
जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे आक्रमक
“पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”; शिवसेनेचा निर्धार

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now