आशियातील सर्वात दुर्दैवी देश! जिथे मुलांना जगण्यासाठी विकावी लागताहेत स्वत:ची खेळणी

असे म्हणतात युद्धामुळे देश १० वर्षे मागे जातो. पण आशियातील सिरिया या देशातील गेल्या ९ वर्षांपासून सुरु असलेल्या युद्धामुळे तिथली परिस्थिती जाणून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या देशातल्या मुलांना जगण्यासाठी आपले खेळणे देखील विकावे लागत आहे.

गेल्या ९ वर्षांपासून सिरियामध्ये गृहयुद्ध सुरु आहे. या युद्धाचा सर्वात जास्त प्रभाव तिथल्या लहान मुलांवर पडला आहे. या युद्धामुळे तिथली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

अलजजीराच्या रिपोर्टनुसार, सिरियातील लहान मुलांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. इदबिल या ठिकाणी राहणाऱ्या मुलांना तर खुप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सिरियातल्या मुलांना आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आपली खेळणी विकावी लागत आहे. या ठिकाणी ५० लाख लहान मुले अशी आहेत, ज्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

रिपोर्टनुसार, २६ लाख मुले अशी आहेत, ज्यांचे कुटुंब त्यांच्यापासून वेगळे झाले आहे. या गृहयुद्धामुळे अनेक कुटुंब त्यांचे घर उध्वस्त झाले आहे. अनेक लहान मुलांनी आपल्या आईवडिलांना या गमावले आहे.

इदबिल या परिसरात राहणारे तीन मुले आपल्या आई-वडिलांचे आणि आपले पोट भरण्यासाठी आपली खेळणी विकत आहे.१० वर्षांची असणारी दारा म्हणते की, युद्धामुळे सुरु असलेले बॉम्बस्फोट आणि हवाई हल्ल्यांमुळे त्यांचे पुर्ण घर उध्वस्त झाले आहे. अशात अनेक मुलांकडे फक्त १ जोडी कपडे आणि काही खेळणीच बाकी आहे.

महत्वाच्या बातम्या-

चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयुरवर बक्षीसांचा वर्षाव! जावाने दिली मोटारसायकल
कोवीड सेंटरसाठी माझी १४ एकर शेती घ्या पण कोवीड सेंटर उभारा; शेतकऱ्याची आर्त हाक
भाजप नेते संजय काकडेंना पुणे पोलिसांनी केली अटक; गुंड गजा मारणे रॅली प्रकरण भोवणार 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.