सध्या समजुतदार मुस्लिम नेत्यांनी धर्मांध शक्तींविरोधात एकत्र येण्याची गरज- मोहन भागवत

पुणे । ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनद्वारा आयोजित एक कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मीयाबाबत मोठे विधान केले आहे.

ते म्हणाले, हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि ते भारतीय हिंदू असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. ते म्हणाले, समजुतदार मुस्लिम नेत्यांनी धर्मांध शक्तींविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. भारतात अल्पसंख्यांक समुदायाला कोणत्याही गोष्टीशी घाबरण्याची गरज नाही.

कारण मुळातच हिंदू कोणाशी शत्रूत्व ठेवत नाहीत. हिंदू शब्द मातृभूमि, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीत एकसमान आहे. त्यामुळे हा विचारांचा अपमान नव्हे, असेही ते म्हणाले. यामुळे मुस्लिम धर्माविरोधात आता संघाची भूमिका ही मवाळ झाल्याचे दिसून येत आहे. ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचे वातावरण निर्माण केले.

हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केले. भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

तसेच फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल, असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले, असे विधान भागवत यांनी केले.

ताज्या बातम्या

“कोकणात भाजपचा मी एकटाच आमदार, तरी ट्रेन सोडली शिवसेनेने किमान अर्धी ट्रेन तरी सोडावी”

नारायण राणे यांच्या गाडीच्या ड्रायव्हरचा मृत्यु; कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल

आईकडूनच घेतला अभिनयाचा धडा! ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील शलाका आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.