सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजनक खुलासा; म्हणाली, मला तो शिवीगाळ करून मारहाण करायचा

सलमान खान आणि सोमी अली यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. सोमी अलीने यापूर्वी मुलाखतीत सांगितले होते की, ती सलमानचा चित्रपट पाहून भारतात आली होती. आता केआरकेने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.

या व्हिडिओमध्ये सोमी अली तिच्या नात्याबद्दल बोलत आहे. ज्यामध्ये आपण ऐकू शकतो की, ज्याच्यासाठी ती तिचे घर सोडून भारतात आली होती, त्यानेच तिला मारहाण केली आहे. सोमीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे वर्णन ब्रॅड-पिटसारखी व्यक्ती असे केले आहे.

केआरकेने व्हिडिओसोबत लिहिले आहे की, सोमी कोणाबद्दल बोलत आहे? म्हणजेच कमाल रशीद खान उर्फ ​​केआरकेने पुन्हा एकदा सलमान खानवर निशाणा साधला आहे. तो काही बोलला नाही पण तो कोणत्या दिशेला बोट दाखवत आहे हे स्पष्ट आहे.

वास्तविक त्याने सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यासोबत लिहिले आहे की, सोमी अली येथे कोणावर आरोप करत आहे? तिला कोण मारायचे? कोणी सांगू शकेल का?

या व्हिडिओमध्ये सोमी म्हणतेय की, मी बॉलिवूड ऐक्टर होते. मी एका मोठ्या स्टारला डेट करत होते, तो भारताच्या ब्रॅड पिटसारखा होता. त्याला शोधण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी मी वयाच्या १६ व्या वर्षी भारतात आले.

केटी होम्सच ज्याप्रमाणे टॉम क्रूझवर क्रश होत तसच माझ त्याच्यावर क्रश होत. मी त्या दुर्मिळ लोकांपैकी एक होते जे त्याच्यासाठी भारतात गेले होते. मी त्याला भेटले आणि डेटिंगलाही सुरुवात केली होती.

सोमी पुढे म्हणते की, हे नातं खूप कटू होतं. हा छळ शाब्दिक तसेच शारिरीकही होता. पण हे सामान्य आहे, या विचाराने मी मोठी झाले होते. वयाच्या १६ व्या वर्षी माझ्या आईच्या बाबतीतही असेच घडले होते.

ती व्यक्ती मला म्हणायची की, मी जाऊन शेजाऱ्याला का मारत नाही? मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझी काळजी करतो म्हणून मी तुला मारतो? मी हे करतो कारण तू असे काम करू नये अशी माझी इच्छा आहे. मी लहान होते आणि मला वाटले की तो बरोबर आहे. कारण तोच माझे पालनपोषण करतो.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, मी १६ वर्षांची होते. मी ‘मैने प्यार किया’ चित्रपट पाहिला आणि सलमान खानच्या प्रेमात पडले. मला वाटले की मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. मी आईला सांगितले की मी उद्या भारतात जाणार आहे. साहजिकच तिने मला खोलीत बंद केले पण मी विनवणी करत राहिले.

आपले नातेवाईक भारतात असल्याचे सोमीने सांगितले होते. तिने वडिलांकडे ताजमहाल पाहण्याचा आग्रह धरला आणि मुंबईतील नातेवाईकांना भेटायचे असल्याचे सांगितले. सोमीने सांगितले की, तिचा भारतात येण्याचा एकमेव उद्देश सलमान खानशी लग्न करणे हा आहे.

महत्वाच्या बातम्या
…तर भारत देश जिहादी बनेल; कंगना पुन्हा बरळली
नमाज पढण्यासाठी हिंदू व्यक्तीने दिले दुकान; म्हणाला जागा कमी पडत असेल तर घर, अंगनही देईल
धक्कादायक! महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर उडाली खळबळ
रामसेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयला येतीय आईची आठवण; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.