”राज्यसभेवर खैरेंसारख्या मराठी माणसाला डावलून अमराठी चतुर्वेदींना पाठवता आणि बेळगावला पराभव झाला की मराठी अस्मिता दुखावते ?”

मुंबई। शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. संजय राऊत यांनी बेळगाव महापालिका निवडणुकीच्या अभूतपूर्व निकालानंतर ट्विटरवर पोस्ट शेअर करत जोरदार टीका केली होती. मात्र आता याच टीकेला भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी त्यांचं ट्विट रिट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे.

राऊत साहेब, राज्यसभेवर खैरेंसारख्या मराठी माणसाला डावलून अमराठी चतुर्वेदींना पाठवता आणि बेळगावला पराभव झाला की मराठी अस्मिता दुखावते ? असा सवाल केला आहे. ‘चुकून’ जर बेळगाव महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली असती तर संजय राऊतांची प्रतिक्रिया काय असती ? तेव्हा प्रादेशिक अस्मिता दुखावली नसती का ? असा सवाल शौमिका महाडिक यांनी राऊत यांच्यावर उपस्थित केला आहे.

संजय राऊत बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर चांगलेच तापले आहेत. ते संधी मिळतच भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. निकालानंतर भाजप-सेनेमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे. याचदरम्यान राऊतांनी एक ट्विट केलं होत.

महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या..अशी टीका राऊत यांनी केली होती.

मात्र आता याच टीकेनंतर शौमिका महाडिक यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे. याआधीही संजय राऊत यांनी बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत तुम्हाला असा प्रश्न भाजपला विचारत राऊतांनी टीका केली होती.

मात्र त्यावेळी देखील “संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस?” असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला होता. व त्यानंतर आता पुन्हा शिवसेना-भाजप एकमेकांवर टीका करत आहेत.
मराठी बातम्या
मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना क्लीनचीट
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन उद्या लाँच होणार, पाहा काय असेल किंमत आणि फीचर्स
सलाम! गरीबांच्या लेकरांना शिकवण्यासाठी रोज २५ किमीचे डोंगर पार करून जाते ही शिक्षीका
सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा नवीन म्यूझिक व्हिडिओ होणार लवकरच रिलीज; फोटो पाहून चाहते भावुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.