कोवीड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवन, रेमडिसीवर वाटपात भेदभाव; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर

पुणे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. उपाचाराअभावी रूग्णांना प्राण गमावावे लागत आहेत. देशात ऑक्सिजन, बेड, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यातील सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लावत आहेत.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना परिस्थीतीवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदर तालूक्यातील रूग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच लवकरात रेमडेसिवीर उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.

शिवतारे म्हणाले, पुरंदरमध्ये १८०० रुग्ण आहेत, रेमडेसिवीरचे इंजेक्शन फक्त २२८ मिळाले आहेत. लसीकरण बाबतीत आमच्यावर अन्याय झाला आहे.  पुरंदरमध्ये जास्त धोका असताना फक्त ३४,००० जणांचे लसीकरण झाले आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर माझी नाराजी नाही. जिल्हाधिकारी आणि FDA यांच्या कारवाईवर संशय आहे. असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

पुढे म्हणाले, ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करावा. कोविड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जाते. आमच्याकडे दुजाभाव केला जात आहे. मला राजकारणावर काही बोलायचे नाही. आमच्या आमदारावर मी काहीही बोलणार नाही. असं शिवतारे म्हणाले.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार भारतात गेल्या २४ तासांमध्ये १,७१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात १ लाख ८० हजार ५३० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सध्या २० लाख ३१ हजार ९७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मानवतेपेक्षा मोठा धर्म नसतो! ऐन रमजानात मशिदीतच उभारले ५० बेड्सचे कोव्हिड सेंटर
सरकारचा सर्वात मोठा निर्णय! १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार
शरद पवारांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं! पवारांच्या नावाने १ हजार बेडचे कोविड सेंटर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.