सेल्फी काढताना विसरला भान; मागून येणाऱ्या मालगाडीचे वाजवला हॉर्न अन..

रेल्वे प्लॅटफॉर्मवर दुर्घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबईत घडलेल्या घटनेत मयूर नावाचा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या तरुणाने एका लहान मुलाचा जीव वाचवला. त्यामुळे तो महाराष्ट्रात हिरो झाला होता.

अशीच एक घटना आता घडली आहे. प्लॅटफॉर्मवर उभे राहून एका तरुणाने चालत्या रेल्वेसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणाचा रेल्वेच्या धक्याने दुःखद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सदर घटना मंगळवारी १८ मे रोजी दुपारी सदर घटना चिखलठाणा रेल्वे स्टेशनवर घडली आहे. मृत झालेल्या तरुणाचे नाव शेख शोएब मेहमूद आहे. त्याचा रेल्वेच्या धक्याने दुःखद मृत्यू झाला आहे.

मंगळवारी दुपारी शोएब आणि त्याचे मित्र चिखलठाणा परिसरात आले होते. त्याच्यासोबत त्याचे चार मित्र पण रेल्वे स्टेशनच्या परिसरात फिरत होते. शोएबला या वेळी चालत्या गाडीसोबत सेल्फी काढण्याचा मोह झाला.

शोएब मोबाईलवर सेल्फी काढत होता. तेव्हाच त्याच्यामागून मालगाडी आली. शोएब या वेळी प्लॅटफॉर्मवर उभा होता. शोएबने या वेळी चालत्या रेल्वेसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

गाडीने गाडीने हॉर्न दिला. पण शोएब चालत्या गाडीसमोरून मागे झाला नाही. त्याचा अचानक तोल गेला आणि तो रेल्वेच्या पुढे जाऊन पडला. त्या वेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा पाय पण मोडला. रुग्णालयात नेत असतानाच मध्येच त्याचा दुःखद अंत झाला.

ताज्या बातम्या
२०११ ला पाकिस्तानी खेळाडूंना ताज हॉटेलमध्ये थांबू देण्यासाठी तयार का नव्हती भारतीय टीम?

सोनू सूद म्हणजे देवच! सोनू सूदच्या फोटोला लोकांनी चढविला हार; दुधाने घातला अभिषेक

दुःखद बातमी; ‘या’ भारतीय क्रिकेटपट्टूच्या वडिलांचे झाले निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.