Share

शेअर छोटा फायदा मोठा! ३५ पैशांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदार मालामाल, १ लाखांचे झाले १० कोटी

shear market

कोरोना महामारीपासून, शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देत असतात. असाच एक शेअर SEL Manufacturing Company Ltd. कंपनीचा आहे.(SEL company shear give huge profit to investor)

या शेअरने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात आपल्या भागधारकांना ११,८०८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने तब्बल ६२,८४२ टक्क्यांहून अधिक परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्सनी आश्चर्यकारक परतावा दिला आहे. या समभागाने दोन वर्षात ६२,८४२.६२ टक्के परतावा दिला आहे. २७ मार्च २०२१ रोजी या शेअरची किंमत NSE (National Stock Exchange) वर फक्त ०.३५ पैसे होती. सध्या या शेअरची किंमत ३७६.४५ रुपये आहे

यामुळे गुंतवणूकदारांना ११,८०८.११ टक्के इतका जबरदस्त परतावा मिळाला आहे. दर वर्षी हा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहे. YTD च्या आधारावर हा शेअर ३९६.१७ टक्क्यांनी वाढला आहे. 3 जानेवारी 2022 या दिवशी या शेअरची किंमत ४४.४० रुपये होती. एका महिन्यात हा शेअर १५१.९२ टक्क्यांनी वाढला आहे.

एका महिन्यापूर्वी म्हणजेच २१ जानेवारीला या शेअरची किंमत ८७.४५ रुपये होती. जर दोन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर आज ती गुंतवणूक १० कोटींहून अधिक झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज ती गुंतवणूक एक कोटी झाली असती.

SEL Manufacturing Company Ltd. या कंपनीच्या शेअरने फक्त दोन वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती केलं आहे. या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल ६२,८४२.६२ टक्के परतावा दिला आहे. आगामी काळात या कंपनीचे शेअर्स आणखी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरने मोडले अनेक विक्रम, वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताचा मोठा विजय
योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचं ‘नाथ संप्रदाय’ कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?
तांत्रिक बिघाडामुळे भारताकडून सुटले मिसाईल, २६१ किमी अंतर ७ मिनिटांत कापत पाकिस्तानात गेले अन्…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now