वाचा रमेश व सीमा देव या सर्वाधिक गाजलेल्या जोडीची लव्हस्टोरी..

आपण आजपर्यंत हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक लव्ह स्टोरी ऐकल्या आहेत. पण खुप कमी लव स्टोरी ह्या शेवटपर्यंत टिकून आहेत. अशीच एक लव्ह स्टोरी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आहे. ही स्टोरी आहे सीमा देव आणि रमेश देवची. सीमा देव यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त आपण त्यांची आणि रमेश देवची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.

रमेश आणि सीमा देव ही मराठी सिनेसृष्टीतील एक हिट जोडी आहे. या जोडीने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. ही चित्रपटांमध्येच नाहीतर खऱ्या आयुष्यात देखील तेवढीच हिट आहे. या जोडीने ८० च्या दशकात मराठीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

सीमा यांच्या घरची आर्थिक परीस्थिती चांगली नव्हती. त्यामूळे त्यांना वयाच्या १५ व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली होती. त्या लहान होत्या त्यामूळे चित्रपटांच्या चित्रीकरणावेळी त्यांच्या आई त्यांच्यासोबत असायच्या.

सीमा देवच्या पहील्या चित्रपटामध्ये रमेश देव यांनी त्यांच्या भावाची भुमिका केली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी रमेश देव सीमाला पाहताच त्यांच्या प्रेमात पडले होते. पण सीमा स्वभावाने खुप शांत होत्या. त्या जास्त बोलत नसत.

यामूळे मात्र रमेश देव वैतागले होते. त्यांनी अनेकदा सीमा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्या बोलल्या नाहीत. रमेश देव यांनी अनके वेळा सीमाशी बोलून त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात ते यशस्वी होते नव्हते.

शेवटी वैतागून रमेश देव यांनी, ‘अहो’ बाई मी काय राक्षस आहे का तुम्ही बोलत का नाही? असा प्रश्न सीमा यांना विचारला. यावर सीमा यांनीकाहीच उत्तर दिले नाही. त्या हसल्या आणि निघून गेल्या. त्यानंतर व्ही.अवधूत यांच्या ‘ग्यानबा तुकाराम’ सिनेमासाठी हि जोडी पुन्हा एकत्र आली.

या सिनेमात रमेश सीमाचे हिरो होते. व्ही. अवधूत दोघांना शॉट समजावत होते. हा शॉट बैलगाडीवर शुट करायचा होता. या बैलगाडीवर गवताचे मोठे भारे ठेवलेले होते. यावर बसुन ॲक्शन म्हटल्यावर सीमा-रमेश बैलगाडीतून येतील. असा हा संपूर्ण शॉट होता. या शॉटची पुर्ण तयारी झाली होती.

पण अचानक एक मोठा ढग आला. यामूळे व्ही.अवधूत यांनी ‘आता एक मोठा ढग आला आहे. तुम्ही उतरु नका. बैलगाडीवरच बसून राहा. ढग गेल्यावर आपण शुटींगला सुरुवात करु’ अशी सूचना सीमा-रमेशला दिली. यावेळेचा फायदा रमेश देव यांनी घेतला.

त्यांनी सीमाला माझ्याशी लग्न करशील का ? असा प्रश्न विचारला. सुरुवातीला सीमाला हा डायलॉग वाटला. त्यामूळे त्या काही बोलल्या नाहीत. पण नंतर त्यांना त्याचा अर्थ समजला. त्यामूळे त्या थोड्या गप्प राहील्या.

थोड्या वेळाने त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, ‘मी आत्ताच कामाला सुरुवात केली आहे. मला काम करुन माझ्या घरची परीस्थिती बदलायची आहे. मी आत्ता लग्नाचा विचार केला नाही.’ रमेश देव यांनी याला ठिक आहे असे उत्तर दिले.

मी वाट बघायला तयार आहे. यानंतर रमेश देव यांनी पाच वर्ष सीमा यांची वाट पाहिली. पाच वर्षांनंतर सीमा यांनी लग्नाचा विचार केला आणि रमेश देव यांना होकार दिला. १ जुलै १९६३ साली या दोघांचे लग्न झाले. त्यानंतर आजही हे दोघे एकत्र सुखाने त्यांचा संसार करत आहेत.

लग्नाच्या एवढ्या वर्षानंतरही हे दोघे सुखाने संसार करत आहेत. त्यांचे कधीही भांडणं झाले नाहीत. या दोघांच्या जोडीकडे बघून प्रेक्षकांना आजही आनंद होतो. आजही प्रेक्षकांना या दोघांना एकत्र बघायला आवडते. सर्वात हिट जोड्यांमध्ये या दोघांची जोडी येते.

महत्वाच्या बातम्या –

पिवळ्या ड्रेसमध्ये अमृताच्या दिलखेच अदा; पहा फोटो

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ट्रोलर म्हणाला ‘तू ऐश्वर्याच्या लायकीचा नाहीस’; अभिषेक बच्चनने दिले ‘हे’ उत्तर

सुहाना सुंदर दिसते की तिच्या मैत्रिणी सुंदर दिसतात? फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.