छोट्या मुलाच्या डान्सवर फिदा झालेली माधूरी त्याच्या करीअरसाठी सरसावली; ‘इथे’ देणार संधी

बॉलिवूड अभिनेत्री आणि धकधक गर्ल माधुरी दिक्षित एक चांगली कलाकार आहे. त्याचबरोबर डान्सरसूध्दा आहे. माधुरी दिक्षितने काही दिवसांपुर्वी ऊसाच्या फडात डान्स करणाऱ्या मुलीचे सोशल मिडियावर कौतूक केले होते. पुन्हा एकदा तिने एका लहान मुलाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात तिने मुलाच्या डान्सचे कौतूक करत त्याला डान्स शोमध्ये घेणार असल्याचं सांगितलं आहे.

माधुरी दिक्षितने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, वाह काय एनर्जी आहे, या मुलाचा डान्स देशाला दाखवण्याची गरज आहे, म्हणून मी याला डान्स दिवाने-०३ च्या मंचावर याच्यातील कला दाखवण्यासाठी घेऊन येत आहे.

या व्हिडिओमध्ये खेड्यातील एक लहान मुलगा हिंदी सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यामध्ये त्याने अभिनेता गोविंदा आणि अनेक मोठ्या कलाकारांच्या गाण्यावर डान्स केला आहे.

माधुरी दिक्षित यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनीही या छोट्या मुलाच्या डान्सचे कौतूक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

माधुरी दिक्षित डान्स दिवाने-३ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून पाहायला मिळणार आहे. या आधीही त्या याच कार्यक्रमाच्या दोन्ही सीजनमध्ये परिक्षक म्हणून पाहायला मिळाल्या होत्या. माधुरीने या मुलाचा व्हिडियो शेअर करत तिने सोशल मिडियात किती ताकद आहे हे दाखवून दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
व्हॅलेंटाईन डे स्पेशल: वाचा धकधक गर्ल माधूरी दीक्षित आणि श्रीराम नेनेची लग्नानंतरची हटके लव्ह स्टोरी
‘मुंबई, पुणे प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार’
पैसे नसतानाही सुरु करा स्वत: चा नवीन व्यवसाय; तरुणांसाठी सोनू सूदची नवीन स्किम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.