दीपक चाहरचा ९० मीटरचा गगनचुंबी षटकार पाहून रोहितने ठोकला सलाम, पहा व्हिडीओ

कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक केले, त्यानंतर शेवटी टीम इंडिया काही प्रमाणात डगमगणार असे दिसत असतानाच दीपक चहरने धुमाकूळ घातला.

दीपक चहरने 20 व्या ओवरमध्ये 19 धावा काढल्या, त्यादरम्यान त्याने एडम मिल्नेच्या बॉलवर दोन चौकार आणि एक शानदार षटकार ठोकला. दीपक चहरने आपल्या छोट्या खेळीत 8 चेंडू खेळून 21 धावा केल्या. दीपकने 2 चौकार, 1 षटकार मारला.

दीपक चहरच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावरच भारतीय संघाला १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकात दीपक लांब फटके मारत असताना पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या रोहित शर्माने त्याच्या शॉटला सलामी दिली.

टीम इंडियाने एका वेळी 140 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे मोठी धावसंख्या करणे कठीण होईल असे वाटत होते. पण दीपक चहर आणि हर्षल पटेल यांनी शेवटी चमत्कार केला. हर्षल पटेलनेही 11 चेंडूत 18 धावा केल्या, त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.

भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने कोलकात्यात सर्वाधिक 56 धावा केल्या होत्या. रोहितसोबत सलामीला आलेल्या इशान किशननेही चांगली सुरुवात केली. ईशानने 29 धावा केल्या. शेवटी श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर या जोडीनेही वेगवान धावसंख्या करण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या
पोरांना अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या NCB अधिकाऱ्यांना तुरूंगात टाका – शिवसेना
पोलीस भरती परीक्षेत कॉफी बहाद्दरांची अनोखी शक्कल, चक्क मास्कमध्येचं बसवले इलेक्ट्रोनिक डिव्हाईस, पाहून पोलीसही हैराण
कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेने मारली बाजी; राणेंचा दारूण पराभव करत केला सुपडा साफ
मोदी सरकार दोन मोठ्या सरकारी कंपन्यांची विक्री करण्याच्या तयारीत, नावे वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.