श्रीदेवीच्या मुलीच्या फोनचा वॉलपेपर झूम करून पहा.. वॉलपेपर पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

बॉलीवूडची हवाहवाई म्हणजे श्रीदेवी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. श्रीदेवी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे कुटुंब अजूनही या धक्क्यातून बाहेर आले नाहीये. आपल्या अप्रतिम अभिनयाने लोकांची मने जिंकणारी श्रीदेवी आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करत होती.

श्रीदेवी आपल्या परिवारासोबत दुबईमध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गेल्या होत्या पण तिथेच त्यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. या बातमीनंतर संपूर्ण देश हादरला होता. आज श्रीदेवीला जाऊन बराच काळ उलटला आहे.

पण श्रीदेवी लोकांच्या मनातून गेली नाही. विशेषतः त्यांचे कुटुंबीय अजूनही श्रीदेवी यांची आठवण काढत असतात. अलीकडेच श्रीदेवीची मुलगी जानव्ही कपूर हीच धकड चित्रपट रिलीज झाला होता. ज्यामध्ये जानव्ही कपूरला पाहिल्यानंतर लोकांना श्री देवीची आठवण झाली.

खुशी कपुर बद्दल सांगायचे झाले तर ती तिच्या आईसारखीच दिसते. नुकताच खुशीचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. हा फोटो एका रेस्टॉरंटबाहेर काढण्यात आला होता. खुशी आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी त्या रेस्टॉरंटमध्ये आली होती.

खुशी कपूरने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. पण या फोटोत अजून एक गोष्ट निरखून पाहण्यासारखी आहे. हा तिच्या मोबाईलचा वॉलपेपर आहे. खुशी कपूरच्या मोबाईलवर तिचा आणि तिच्या आईचा वॉलपेपर आहे.

हा फोटो बराच जुना दिसत आहे कारण तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. यामध्ये श्रीदेवी आणि खुशी कपुर हसताना दिसत आहेत आणि या फोटोत खुशी कपुर खूपच लहान दिसत आहे. खुशी कपूरच्या मोबाईलवरील हे वॉलपेपर बघून असे दिसते की, ती आपल्या आईवर किती प्रेम करते.

महत्वाच्या बातम्या-

पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करताच कंगना कडाडली; म्हणाली…

कंगणाचे शिवसेनेबाबतच ‘ते’ वक्तव्य निघालं खोटं; सर्वांसमोर आपटली तोंडावर

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.