Share

मेहंदी रंगली नवरी सजली! पहा शिवानी आणि विराजसच्या मेहंदी सोहळ्याचे खास व्हिडिओ

टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध कपल अभिनेता विराजस कुलकर्णी(Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. नुकताच त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या मेहंदी कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी रंगवण्यात आल्याचे दिसत आहे.(see shivani and virajas mehandi ceremony video)

या व्हिडिओवर अनेक युझर्सनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचा मेहंदी सोहळा पार पडला. अभिनेत्री शिवानी रांगोळेने तिच्या मेहंदीच्या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळे खूप आनंदात दिसत आहे. तिने मेहंदी सोहळ्यासाठी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या सोहळ्यासाठी अभिनेत्री शिवानी रांगोळेने खास फुलांचे दागिने परिधान केले असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते.

त्यानंतर चाहत्यांना विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. काही चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांना लग्नाच्या तारखेबद्दल विचारणा देखील केली होती. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहेत.

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या विवाह सोहळ्याला विराजस आणि शिवानी एकत्र आले होते. या सोहळ्यातील त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्यानंतर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे रिलेशनशिपमध्ये असल्याचा चर्चा रंगू लागल्या होत्या. अभिनेता विराजस कुलकर्णीने झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिका केली होती. तर अभिनेत्री शिवानी रांगोळे हीने झी युवा वाहिनीवरील ‘बन मस्का’ या मालिकेत काम केले होते.

महत्वाच्या बातम्या :-
तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पिड स्लो आहे का? ‘या’ खास ट्रिक्स वापरा अन् वाढवा तुफान स्पिड
छगन भुजबळांकडून राज ठाकरेंच्या इतिहासाचा पंचनामा; ‘…तेव्हा टिळक 13 वर्षाचे होते’
मशिदींवरील भोंगे उतविण्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुकसान होईल; ब्राह्मण महासंघ आक्रमक

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now