विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामूळे राज्य सरकारवर विरोधी पक्षाकडून हल्लाबोल करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिला होता. जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली होती. असे असताना सुध्दा फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्यात येणार असल्याने राज्य सरकारवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे.
दरम्यान, फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ कार सुध्दा काढून घेण्यात येणार आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ मी मुख्यमंत्री असताना मला धमक्या आल्या होत्या तेव्हा मला सुरक्षा देण्यात आली होती. या सरकारला वाटत असेल की, माझ्यावरील धोका कमी झालेला आहे. म्हणुन त्यांनी माझी सुरक्षा कमी केली असावी. मला याबाबत काहीही बोलायचे नाही.’’
देवेद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, नारायण राणे, राम कदम, प्रसाद लाड, प्रविण दरेकर या विरोधी पक्षातील नेत्यांसह महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह ‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात
“ठाकरे सरकारचा घोटाळा कधीही बाहेर येईल”; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची तक्रार
राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव? ‘या’ जिल्ह्यात २८ कोंबड्या दगावल्या…
८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री पुनम ढिल्लों अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब का झाल्या ?