खळबळजनक! बँकेत मास्क न घातल्यामुळे सुरक्षारक्षकाने ग्राहकाला घातली गोळी

कोरोना अजूनही देशातून हद्दपार झाला नाही. यामुळे अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. तिसरी लाट देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये बँकेत मास्क न घातल्यामुळे सिक्युरिटी गार्डने ग्राहकाला गोळी घातली.

यामुळे एकच खळबळ उडाली, जखमी झालेल्या ग्राहकाला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. गोळी घालणाऱ्या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. मास्क लावा म्हटल्यानंतर शिवीगाळ केल्यानंतर आमच्यात भांडण झाले यात चुकुन गोळी लागली असे सुरक्षारक्षकाने सांगितले आहे.

यामुळे मात्र खळबळ उडाली होती. बरेलीमध्ये बॅंक ऑफ बडोदामध्ये ही घटना घडली. ग्राहक राजेश कुमार आणि सुरक्षारक्षक केशवप्रसाद मिश्र यांच्यात बॅंकेत काही कारणांनी वाद झाला. त्यानंतर हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की सुरक्षारक्षक केशवप्रसादने राजेशकुमारला गोळी घातली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यांच्यातील वादानंतर केशव प्रसाद मिश्राने रागात येऊन राजेश कुमारला गोळी घातली. जखमी झालेल्या राजेश कुमारला दवाखान्यात दाखल केले आहे. तो अद्याप बेशुद्ध आहे त्यामुळे त्याची बाजू समजू शकलेली नाही, असे एसपी रविंद्र कुमार यांनी सांगितले आहे. पोलीस याबाबत सविस्तर तपास करत आहेत.

राजेश बँकेच्या कामानिमित्त येथे आला होता. तो शुद्धीवर आल्यावर त्याची बाजू कळू शकेल. या बँकेच्या वरिष्ठ अधिकारी गीता भुसाल यांनी सांगितले की, पोलिस आणि फॉरेंसिक टीम सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत. ते पाहिल्यानंतर त्यांना घटनेच्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. या प्रकरणाची मात्र सगळीकडे चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! आयपीएलनंतर भारतात होणारा टी-२० वर्ल्डकपही रद्द, आता या देशात रंगणार सामने

श्रावणबाळच! स्कूटरवरून आईला घेऊन कश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्व तीर्थस्थळांना भेट दिली; नोकरीही सोडली

काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी शिल्पा शेट्टीला मिळणार होते १० कोटी, मात्र…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.