शरद पवार आणि अमित शहांमध्ये अहमदाबादेत गुप्त बैठक; राज्याच्या राजकारणात भूकंप?

मुंबई : राज्याच्या राजकारणात एकीकडे सचिन वाझे, परमबीर सिंह प्रकरणावरून ठाकरे सरकार टीकेचं लक्ष्य असतानाच शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांची भेट घेतल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे.

अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्चला रात्री ९.३० वाजता पटेल आणि बड्या उद्योगपतीची भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. मात्र ते या बैठकीला उपस्थित होते का, हे समजू शकलेलं नाही.

याशिवाय शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचे वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्राने दिले आहे. या भेटीसाठी पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटनं शांतिग्राममधल्या गेस्टहाऊसला आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या 

अजितदादा संतापले; आवाहन करुनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसेल तर कठोर निर्णय घ्यावा लागेल

तापसी पन्नूने दिले एका वयोवृद्ध महिलेला जीवदान, वाचून तुम्हीही कराल कौतुक

आत्महत्येपूर्वी दीपाली यांचं पतीला पत्र; आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.