लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू १५ तोळं सोनं घेऊन पळाली, दुसऱ्यासोबत लग्न करताना घावली, आणि..

अमळनेर तालुक्यात एक विचित्र घटना घडली आहे. येथे एक लग्नसोहळा पार पडला. मुलाच्या घरचे आनंदात असतानाच दुसऱ्याच दिवशी त्यांना धक्काच बसला. दुसऱ्या दिवशी नववधू १५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली. यामुळे तिचा शोध सुरू झाला.

असे असताना दुसऱ्या दिवशी ती दुसऱ्यासोबत लग्न करताना दिसली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी नववधू, तिची मावशी आणि मामाला अटक केली आहे. अमळनेर पोलिसांनी ही कारवाई केली. यामुळे तिचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

यामध्ये अजून काहीजण पसार झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सोनू शिंदे, पूजा साळवे, योगेश साठे रा. हिंगोली यांना ताब्यात घेतले आहे. सोनू या मुलीचा विवाह भूषण सौदाने यांच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी ती पसार झाली.

यामुळे घरातील व्यक्तींना एकच धक्का बसला. त्यांनी शहादा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ती पसार झाल्यानंतर मारवाड येथे गेली होती. तेथे ती दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. माहितीच्या आधारे एपीआय राहुल फुला यांनी सहकाऱ्यांसह येथे छापा टाकला.

मात्र पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी पळ काढला, मात्र पोलिसांनी पुढच्या पोलीस ठाण्यात ही माहिती दिली आणि त्यांना अटक करण्यात आली. या घटनेने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र हा सर्व प्रकार ठरवून करण्यात आला आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत. पडावल येथे ती दुसरे लग्न करणार होती. मात्र त्यांचा डाव फसला. आता शहादा पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे पहिले लग्न केलेल्या मुलाला आणि मुलाला कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

धक्कादायक! लसींमुळेच निर्माण होतायत कोरोनाचे नवे व्हेरिएंट, प्रसिद्ध साथरोग तज्ज्ञाचा दावा

मोदी TV वर येऊन रडतील, खासदाराने केलेली भविष्यवाणी अखेर खरी ठरली, पाहा व्हिडिओ

VIDE0: कोरोना रुग्ण एका झटक्यात बरा होणार! औषधासाठी तोबा गर्दी, ICMR करणार चाचणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.